हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हि तिच्या गोड गळ्याने आणि सुमधुर स्वराने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसते. तिच्या गायन कौशल्याच्या जोरावर तिने स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे आणि यामुळे तिचा भला मोठा चाहता वर्ग आहे. ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्समधून कार्तिकी घराघरांत पोहोचली. त्यानंतर पुढे विविध ढंगाच्या अनेक गाण्यांनी ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसली. कार्तिकीला लहानपणी घरातचं गाण्याचं बाळकडू देणारे तिचे वडील ‘पंडित कल्याणजी गायकवाड’ हे स्वतः पट्टीचे गायक आहेत. त्यांच्या सुरेल कारकिर्दीला सलाम करण्यासाठी शासनातर्फे त्यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड हे स्वतः गायक आणि संगीतकार आहेत. त्यांची कारकीर्द फार मोठी असून त्यांच्या या सुरेल प्रवासाचा कार्तिकी देशील एक महत्वाचा भाग आहे. कार्तिकीच्या वडिलांना त्यांनी संगीताचा वारसा जपल्याबद्दल आणि संगीत विश्वातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार तथा गायक, वारकरी संप्रदायाचे भूषण, भजन सम्राट पं कल्याणजी गायकवाड यांना ‘महाराष्ट्र शासन कंठ संगीतरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. याबाबत स्वतः कार्तिकीने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
गायिका कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा भला मोठा चाहता वर्ग आहे. तर कार्तिकीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन देत लिहिलंय कि, ‘महाराष्ट्र शासनाचा ‘मानाचा कंठ संगीत’ हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री मा. श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पं कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पं कल्याणजी गायकवाड यांच्या संपूर्ण शिष्य परिवारातर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचे खूप मनापासून आभार!!’ कार्तिकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post