Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘फोन भूत’ चित्रपटाचा टिझर पाहिला का..?; ब्युटीफुल कॅटरिना घेऊन येतेय एक भयानक कॉमेडी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Phone Bhoot
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि आताची मिसेस कौशल ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. चाहत्यांची लाडकी कॅटरिना अतिशय सुंदर दिसते यात काही वादच नाही. पण आता ती भूत बनून येतेय घाबरवायला. होय घाबरवायलाच.. खूप मोठ्या ब्रेकनंतर आता कॅटरिना लवकरच मोठ्या पडद्यावर येतेय आणि मुख्य म्हणजे घोस्ट होऊन येतेय. असेही तिचे चाहते तिला पुन्हा एकदा चित्रपटांत पाहायला उत्सुक आहेत. तर आता आतुरता संपली. स्वतः अभिनेत्रीने आपण लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहोत असे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हीच लग्न अभिनेता विकी कौशल सोबत झाल्यानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट आहे कॅटरिनाने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे तिच्या या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटाची माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर सोबतच तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाचीदेखील तारीख जाहीर केली आहे. आगामी चित्रपटाची पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, ‘फोन भूतच्या जगात तुमचं स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेसृष्टीत दाखल होत आहे. कॅटरिनाने ही पोस्ट शेअर करताच तिचे चाहते तीच्या आगामी चित्रपटाबद्दल अधिकच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात कॅटरीना सोबत अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यातील कॅटरीना चा लूक तूर्तास तरी सोशल मीडियावर चर्चेत आणि चाहत्यांना आवडला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

इतकेच नव्हे तर कॅटरीना, ईशान आणि सिद्धांत हांचा हा आगामी चित्रपट चर्चेत असण्याचे आणखी एक कारण आहे. या चित्रपटाचा टीझरसुद्धा रिलीज झाला आहे. अगदी २२ सेकंदाचा हा टिझर आहे. या टीझरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज तर लावता येत नाही. पण चित्रपट मनोरंजन पुरेपूर करणार यात काही शंका नाही. या टिझरमध्ये स्त्री भूताची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता कॅटरीना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी भूत बनून येत आहे. काय मग…तुम्ही घाबरायला तयार आहात ना..?

Tags: Instagram PostIshan khattarkatrina kaifSiddhant chaturvediupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group