Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लॉक किया जाये? पुन्हा रंगणार प्रश्नोत्तराचा खेळ; KBC चे नवे पर्व लवकरच होणार सुरु

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
KBC
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता पुन्हा एकदा सामान्यातील सामान्य होणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात KBCचे नवे पर्व सुरु होणार आहे. अनेकांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील मोठा शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. या शोची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्या सर्व प्रेक्षकांची वाट पाहण्याची वेळ संपली आहे. केबीसीच्या नव्या पर्वाची जाहीरातही आता टीव्हीवर झळकु लागली आहे. हा कार्यक्रम येत्या २३ ऑगस्ट २०२१ पासून प्रसारित होणार असल्याचे समोर येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan IFH Fan Club (@amitabhbachchanifhfanclub)

पुन्हा एकदा या पर्वाची चाहूल लागताच अनेक लोक करोडपती होण्याचे स्वप्न बाळगताना दिसत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतीळ महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांची जणू केबीसीशी नाळ जोडली आहे. त्यामुळे केबीसीच्या या पर्वाचेही सूत्र त्यांच्याच हाती असणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि अजूनही पूर्ण होणार आहे. बिग बीं’च्या सूत्रसंचालनाचा अनोखा अंदाज, या शोमध्ये येणारे विविध स्पर्धक, त्यांच्या जीवनकथा आणि शोच्या निमित्ताने समोर येणा-या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीचा टीआरपी नेहमी अव्वल स्थानावर असतो.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan IFH Fan Club (@amitabhbachchanifhfanclub)

मुख्य आणि विशेष बाब सांगायची झालीच तर केबीसीपुढे इतर कोणत्याही बिग बजेट शोची जादू एकदम फिकी पडते. यांत सलमान खानचा बिग बॉस आणि इतर कॉमेडी, सिंगिंग व डान्सिंग रिऍलिटी शोचा विशेष समावेश आहे. केबीसीचे आतापर्यंतचे १२ही पर्व प्रचंड गाजले आहेत. त्यामुळे शोची प्रचंड लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी १३वे पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला आणायचे पक्के केले आहे. याचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा बिग बी करणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढूच लागली आहे. आता प्रतीक्षा आहे ती KBC १३ सुरु होण्याची…

Tags: Kaun banega crorepati 13reality showSony TV
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group