Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिल्ली व अहमदाबादच्या सरणावर बक्कळ पैसा कमावणाऱ्यांचा जोर; दिग्दर्शक केदार शिंदेंची जळजळीत पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 3, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kedar Shinde
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोना वाढीत रुग्णांच्या संख्येत रोज नव्याने वाढ होताना दिसत आहे. कुठे आॅक्सिजनची कमतरता तर कुठे आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता अनेक राज्यांत शासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत आयपीएल सारखा इव्हेंट अगदी जोरदार सुरु आहे. म्हणायला प्रेक्षक तर नाहीत, पण म्हणून आयपीएलच्या थाटात काही कमी नाही. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी याच विषयावर एक तिखट पोस्ट फेसबुकवर शेअर करीत आय पी एल वाल्यांचा जाल केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट जोरदार वायरल होत आहे.

‘याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे… रणवीर सिंग आणि त्याच्या जाहिरातींमध्ये दाखवले जाणारे आयपीएलवाले. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरात…’, अशा आशयाची पोस्ट केदार शिंदे यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी ठसका देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘केदार दादा, खूप दिवसांनी बोललात, पण कमाल बोललात,’ अशी कमेंट त्यांच्या या पोस्टवर एका युजरने केली. योग्यक्षणी, योग्यवेळी, योग्य निशाणा. एकही मारा लेकीन सॉलिड मारा, असे देखील एका युजरने लिहिले़.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांच्या अनेक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? असा सवाल त्यांनी अगदी काही दिवसापूर्वीच विचारला होता. टीव्हीसाठी बाईट्स देणा-या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते़ त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? हवाय कशाला एवढा फौजफाटा? मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असतील, अशी राजकीय नेतेमंडळींवर नेम साधणारी पोस्ट त्यांनी अलीकडे लिहिली होती.

Tags: Facebook PostIPL Tournament 2021Kedar shindemarathi directorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group