हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक केदार शिंदे हे गेल्या काही महिन्यापासून आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. कारण हा चित्रपट त्यांच्यासाठी अत्यंत जवळचा आहे. आपले आजोबा शाहीर साबळे यांचा लोककलेचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीतही रुजवण्यासाठी हा सारा अट्टाहास. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान केदार शिंदे यांच्या रक्तातील कलेचे दर्शन झाले.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केदार शिंदे शाहिरांचे वाद्य असणाऱ्या लाकडी डफावर थाप देताना दिसले. या व्हिडिओमध्ये त्यांनी डफ वाजवीत काही सूर छेडले आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी अतिशय छोटं मात्र समर्पक असे कॅप्शन दिले आहे. केदार शिंदे यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, It’s in blood… ( म्हणजेच हे रक्तातच आहे). हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी खास पसंती दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहताच शाहिरांचा वारसा अविरत असाच चालू राहील याची खात्री पटते. केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू असून शाहिरांचाही एक सुवर्ण काळ होता जो कुणालाही ठाऊक नाही. तो सगळ्यांना माहित व्हावा म्हणून या कलाकृतीची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटात महाराष्ट्राच्या लाडक्या शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. तर शाहिरांच्या पत्नी सौ. भानुमती कृष्णराव साबळे यांची भूमिका त्यांची पणती म्हणजेच केदार शिंदे यांची लेक सना शिंदे साकारणार आहे.
Discussion about this post