हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी विविध माध्यामातून प्रेक्षकांची मने जिंकली. नाटक, मालिका आणि अगदी सिनेमातून त्यांनी विविध कलाकृती सिने सृष्टीला दिल्या. यानंतर ते आता आपले आजोबा शाहीर साबळे यांच्या लोककलेचा वारसा जपत तो पुढे नेण्यासष्ठी एक प्रभावशाली कलाकृती तयार करीत आहेत. ज्याचे नाव ‘महाराष्ट्र शाहीर’ आहे.
या चित्रपटातून त्यांची लेक सना शिंदे जिचा आज वाढदिवस आहे ती आपल्या पणजीची म्हणजेच शाहीर साबळे यांच्या पत्नी भानुमती कृष्णराव साबळे यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेतून ती प्रथमच चित्रपटात पदार्पण करत आहे. त्यामुळे केदार शिंदे यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत भावनिक मात्र मोलाची गोष्ट सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.
लेकीसाठी केदार शिंदे म्हणतात, ‘प्रिय सना…तशी रोजच भेटतेस.. पण आज हे लिहिण्याचं कारण, तुझा वाढदिवस.. दरवर्षी प्रमाणे आजही तो आलाच!!! पण दरवर्षी पेक्षा यंदा त्याचं महत्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करते आहेस.. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खुप आव्हानात्मक असणार आहे. कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलस.. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस.. माझ्या शिव्या ओरडा हक्काने खाललास.. खुप वेळा डोळ्यात पाणी सुध्दा आलं असेल. पण तू, हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची ट्रिटमेंट कधीच मिळू नये याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही..’
पुढे लिहिलंय कि, ‘आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भुमिका करते आहेस. त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा excited आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.. सना.. कलाकाराचं आयुष्य हे ECG सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो… मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव!!!!! तुझाच बाबा’
Discussion about this post