हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव म्हणजे केदार शिंदे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून केदार शिंदे यांनी प्रेक्षकांनी नेहमीच भारावून टाकले आहे. विविध कलाकृती सादर करीत त्यांनी मनोरंजन विश्वात मोठे योगदान दिले आहे. हिट पे हिट देत समाज भान राखत येत्या काळात आणखी नव्या कलाकृती करण्यासाठी केदार सज्ज आहेत. पण हि प्रगती हे यश मिळवण्यासाठी त्यांना जिने सोबत दिली त्या बायकोसाठी आज एक खास पोस्ट केदार यांनी शेअर केली आहे.
त्याच काय आहे, आज केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा जन्मदिवस आहे. याच निमित्ताने केदार यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत केदार यांनी कॅप्शमध्ये लिहिले आहे कि, ‘वाढदिवस आज जीचा आहे ती.. माझं सर्वस्व आहे. बेला शिंदे… आयुष्यातले अनेक चढउतार तीच्या सोबत मी अनुभवले आणि अनुभवतोय. मी नाटक सिरीयल सिनेमा या तीनही क्षेत्रात जे काम करू शकलो ते तीच्या भक्कम पाठिंबा असल्यानेच.
कारण एका ठिकाणी स्थीरावण्याच्या आत मी दुसऱ्या मिडीयममध्ये उडी मारली. पण तीने कधी हू का चू केलं नाही. पैसा येतो आणि तोही स्थीरावण्याआधी त्याला सतरा पारंब्या फुटतात. पण ही मात्र नेटाने पाठीशी. ही आणि स्वामी नसते तर मी नक्कीच नसतो. २०२३ ५०वर्षाची झाली.. तुमच्या साक्षीने वचन देतो.. आता यापुढे तीच्या ओटीत खुप काही पडेल असंच काम करणार. श्री स्वामी समर्थ’
केदार शिंदे यांच्या या पोस्टवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कळकरांनी बेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केदार यांच्या चाहत्यांनीदेखील बेला शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, आगामी काळात ‘बाईपण देगा देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ असे २ दमदार चित्रपट घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्माती म्हणून बेला शिंदे कार्यरत आहेत. या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
Discussion about this post