हॅलो बॉलीवूड : मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde). केदार शिंदे (Kedar Shinde) हे सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांचे नातू आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde)हे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटात केदार शिंदेची मुलगी सना शिंदे हि महत्वाची भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी त्यांच्या मुलींसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी मुलीचे लहानपणापासूनच्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी मुलीसाठी खास पोस्ट लिहून तिला तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ”तुम्हाला मुलगी झाली आहे” हे (त्या काळाला अनुसरून) भित भित जेव्हा नर्स ने मला सांगितलं होतं तेव्हा आनंदाने नाचलो होतो मी.. तो आनंद त्या दिवसापासून आजपर्यंत टिकून आहे तो फक्त तुझ्यामुळे…”सना” तुझ्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडू पाहतंय.. हा नवीन प्रवास आहे.. ही नवी सुरुवात आहे.. मी सतत तुझ्या सोबत असेनच. पण लढा हा तुझा तुलाच लढावा लागणार आहे.” तसेच ”भविष्यात लोकांना कायमस्वरूपी लक्षात राहील अशीच कामगिरी तुझ्याकडून होवो.. हीच स्वामी चरणी प्रार्थना.. ते पाठीशी आहेतच…आपल्याला मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा मिळाला आहे. माझे आजोबा आणि तुझे पणजोबा “शाहीर साबळे” यांनी नेहमीच सर्वोत्तम काम करून रसिकांच्या मनात घर केलं.. मी तोच प्रयत्न करतो आहे.. तू सुद्धा त्याच दिंडीत वारकरी म्हणून सहभागी होते आहेस..तुला खुप शुभेच्छा…” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे (Kedar Shinde) निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी शाहिरांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतिमा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिले आहेत. महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 28 एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Discussion about this post