Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

संजय नार्वेकरला ‘वेडा’ म्हणणारी हि पोर 20 वर्षांनी पुन्हा मनोरंजन करण्यास सज्ज; केदार शिंदेंची पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
197
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगंबाई अरेच्चा’ हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील नायकाला स्त्रियांच्या मनातील ऐकू येत असतं. ज्यामुळे तो भांबरून जातो आणि याच भांभारलेल्या पुरुषाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. इतकेच काय तर हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. या चित्रपटात अभिनेता संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणीही चांगलीच गाजली. दरम्यान यामध्ये आपण एक चिमुकली मुलगी पहिली असेल जी प्रत्येकाला भावली होती. संजय नार्वेकरला ‘वेडा’ म्हणणारी हि पोर आता थेट २० वर्षांनी पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात परतणार आहे. मात्र आता हि चिमुकली चांगलीच मोठी झाली आहे बरं का.. आणि मुख्य म्हणजे हि चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून केदार शिंदेंची लेक आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपण ‘अगंबाई अरेच्चा’ चित्रपटातील सिन पाहू शकता. यामध्ये चिमुकली सना केदार शिंदे दिसते आहे. केदार शिंदे यांनी हि व्हिडीओ पोस्ट शेअर करताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..” हे वाक्य बोलणाऱ्या छोट्याशा मुलीला तुम्ही २००४ पासून ओळखतच असाल.. पण २०२३ मध्ये येणाऱ्या महाराष्ट्र शाहीर मध्ये भानूमती म्हणून पदार्पण करणारी हीच छोटीशी मुलगी आहे हे तुम्ही ओळखलत का..?? सना शिंदे.. माझी लेक.. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या प्रवासात तिच्या सोबत असू द्या.. श्री स्वामी समर्थ..’

View this post on Instagram

A post shared by Sana Kedar Shinde (@sanashinde)

केदार शिंदे यांच्या लेकीने लहानपणीच प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण या चित्रपटानंतर पुन्हा सना चित्रपटात दिसली नाही. ती थेट आता २० वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात सना शाहीर साबळेंच्या पत्नीची म्हणजेच ‘भानूमती’ यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. २००४ साली ‘अगंबाई अरेच्चा’ आणि आता थेट २०२३ साली येणाऱ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ मध्ये सना आपल्या भेटीला येत आहे. अलीकडेच तिचा या चित्रपटातील लूक शेअर करण्यात आला होता. जो अत्यंत सालस आणि सोज्वळ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितो आहे.

Tags: Kedar shindeMaharashtra ShahirMarathi upcoming movieSana Shindeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group