Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गरमागरम कॉफीसोबत गरमागरम चर्चा रंगणार; केजो’च्या टॉक शोचा आठवा सीजन येणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Coffee With Karan
0
SHARES
82
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा नेपोटीझमच्या मुद्द्यावरून करण जोहर ट्रोल होताना दिसला आहे. विविध विषयांवर विविध वक्तव्य करण्यात आणि जाणून बुजून कळी काढण्यात करण जोहरची बरोबरी करणे कुणालाही सहज शक्य नाही. करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोसाठी फार प्रसिद्ध आहे आणि आता त्याच्या याच टॉक शोचा आगामी आठवा सीजन येतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आता करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोबद्दल वेगळं काय सांगायचं. या टॉक शोचे गेले ७ सीजन तुफान गाजले आहेत. या शोमध्ये करण बॉलिवूड सिनेविश्वातील नामांकित आणि बड्या व्यक्तींना कॉफी पिण्यासाठी म्हणून आमंत्रित करतो. यानंतर तो या सेलिब्रिटींसोबत विविध विषयांवर गप्पा मारतो. मग त्यांच्या गप्पा थोड्या नरम तर थोड्या गरम विषयांकडे वळतात. अनेकदा या शोमध्ये सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यासायिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले जातात. काही कलाकार थेट उत्तर देतात. तर काही कलाकार मात्र चिडचिड करताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक ट्रेंडिंग जोड्या बनल्या आहेत. आलिया भट्ट- रणबीर कपूर, विकी कौशल- कॅटरीना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी ता त्यांपैकी काही जोड्या आहेत. आतापर्यंत या शोचे ७ सीजन यशस्वी ठरले आहेत. यानंतर आता करणने या शोच्या आठव्या सीजनची घोषणा केली आहे. करण जोहर यंदाच्या सिजनसाठी आपल्या शोमध्ये आलिया- रणबीर, शाहरुख खान, करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याचे ठरवले आहे. हा सीजन येत्या जूनच्या अखेरीस Disney+ Hotstar वर सुरु होणार आहे.

Tags: coffee with karanInstagram PostKaran joharTalk ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group