Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अखेर जामीन मिळाला! केतकी चितळेला ठाणे कोर्टाचा दिलासा; शरद पवारांवर केली होती आक्षेपार्ह पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Ketki Chitale
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा पाहुणचार घेत होती. याचे कारण म्हणजे फेसबुक पोस्ट. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिने अधिकृत फेसबुक हँडलवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती जी तिला चांगलीच भोवली. याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला जनतेचा रोष पत्करावा लागलाच शिवाय न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे पाहुणचारही जोरदार झाला. यानंतर अखेर तिला २२ जून २०२२ रोजी जमीन मंजूर झाला आहे.

BREAKING: Marathi actress #KetakiChitale who was arrested for posting allegedly derogatory post on Facebook against NCP Leader Sharad Pawar, granted BAIL by Thane Court

— LawBeat (@LawBeatInd) June 22, 2022

शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी विरोधात विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नुकतीच ठाणे कोर्टात सुनावणी पार पडली आणि अखेर केतकी चितळेला या प्रकरणात दिलासा देत ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. याआधी कळंबोली पोलिसांनी केतकीला जामीन दिला होता. गेले कित्येक दिवस केतकी जामीनासाठी प्रयत्नात होती. मात्र तिला काही जामीन मिळत नव्हता. केतकीने मार्च २०२० मध्ये ‘नवबौद्ध लोक ६ डिसेंबरला मुंबई दर्शनाला येतात’ अशी पोस्ट केली होती. त्यामूळे केतकीवर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल होता. परंतू या प्रकरणात सुद्धा ठाणे कोर्टाकडून तिला २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवार यांच्याबाबत अतिशय अर्वाच्य भाषेतील लिखाणाचा वापर केला होता. नितीन भावे नामक व्यक्तीचे नाव जोडत तिने हि पोस्ट केली होती. याबाबत कळवा पोलीस ठाण्यात १५३ ओ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विविध पोलीस ठाण्यात केतकीवर गुन्हा दाखल झाला आणि केतकी चांगलीच अडकली. मात्र आता शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसोबत अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल झालेल्या केसबाबतही केतकीला जामीन मंजूर झाला आहे.

Tags: Bail GrantedControversial PostFacebook PostKetaki ChitaleSharad Pawar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group