हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच नेहमी चर्चेत राहिली आहे. विविध विषयांवर, विविध मुद्द्यांवर कायम आक्षेपार्ह पोस्ट करणे, परखड बोलण्याच्या नादात खाजवून कळ काढणे यामुळे केतकी वारंवार प्रकाशझोतात येत असते. तरीही तिचा सोशल मीडियावरील वावर पाहून तिचे करावे तेव्हढे कौतुक कमीच. आता काय तर तिने थेट पुण्यात जाऊन पुणेकरांची कळ काढली आहे. गुढीपाडव्या निमित्त पुण्यात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर लागले असताना त्यावरील एक चूक केतकीच्या लक्षात आली. यावरून तिने पुणेकरांची अगदी अब्रूचं काढली आहे.
केतकीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटलंय कि, ‘नमस्कार मी केतकी चितळे, आता मी आहे पुण्यात.. म्हणजेच स्वघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत.. रस्त्यावर चालताना मला बऱ्याच ठिकाणी ‘हॅप्पी गुढी पाडवा’ असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला.. की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता.. आजही नवीन वर्षांच्या हॅप्पी गुढी पाडवा अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का.. असो.. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..’. केतकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केतकीचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तिच्या विषयाचे समर्थन केले आहे. तर काहींनी थेट ट्रोलिंगचा सूर धरला आहे. एकाने यावर कमेंट करत ‘आली परत बावळट..’ असे म्हटले आहे. तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘अगं बाई.. स्वघोषित नसतं ते.’ याआधीदेखील अनेकदा केतकी अशाच विविध पोस्ट शेअर केल्यामुळे चर्चेत राहिली आहे. नुसती चर्चेत नाही तर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पण थेट बोलणे आणि परखड व्यक्त होणे हा तिचा मूळ स्वभाव असल्याने ट्रोलिंगसारख्या गोष्टींना केतकी कधीच घाबरलेली दिसली नाही.
Discussion about this post