हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच काही दिवसांपूर्वी ‘हर हर महदेव’ या ऐतिहासिक चित्रपटात मूळ इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ठाण्यातील मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा थिएटरमध्ये शो सुरु होता आणि या ठिकाणी जाऊन आव्हाडांनी शो बंद पाडला. तसेचं येथे मारहाण देखील केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान या वादात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतल्याचे समजत आहे. तिने म्हणे पोलिसांना पत्र लिहून आणखी कलम वाढवा अशी विनंती केली आहे.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि स्वतःच अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. शरद पवारांवर केलेल्या पोस्टमुळे तिनेही जेलची हवा खाल्ली आहे. यानंतर आता कोणाचं काय तर कोणाचं काय..? अशी भूमिका तिने घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमध्ये घडलेल्या प्रकारामुळे वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर केतकी चितळे अचानक सक्रिय झाली आहे. केतकी चितळेच्या वतीने तिच्या वकिलांनी वर्तकनगर पोलिस स्टेशनला एक पत्र लिहून पाठवलं आहे. ज्यामध्ये तिने आव्हाडांवर लावण्यात आलेली कलम कमी असल्याचे म्हटले आहे.
केतकी चितळे हिने आपल्या वकिलांच्या मार्फत वर्तकनगर पोलिस स्टेशनला एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये तिने आव्हाडांवर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसल्याचे म्हटले आहे. या पत्रातील प्रमुख मागण्यांमध्ये केतकी म्हणतेय कि, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथिदारांवर कलम ३५४ लावा. कारण थिएटरमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याची पत्नी देखील तेव्हा सोबत होती. तसेच या मारहाणीदरम्यान त्या महिलेलादेखील मारहाण झाली आहे. हे सगळं प्लॅनिंग करुन केलं आहे. यामुळे कलम १२० ब देखील लावा. आव्हाडांवर सध्या लावण्यात आलेल्या कलमांमध्ये या कलमाची देखील भर घाला अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टाकडून ऑर्डर आणून ही कलमे वाढवायला लावू.’ असे तिने या पत्रात स्पष्ट लिहिले आहे.
Discussion about this post