हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे हि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ती सध्या कोठडीत आहे. आत्ताच्या सुनावणीनंतर तिची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत झाली आहे. यानंतर तिने लगेच जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. कदाचित तिला जामीन मिळेलही पण तिच्या या पोस्टमुळे उफाळले जातीवाद कसा मिटेल..? या पोस्टवर कमेंट करताना अनेक लोकांनी केतकीच्या विचारांपेक्षा तिच्या आई वडिलांनाच टार्गेट केलयं. तिचे आई वडील दोन वेगवेगळ्या जातीचे असल्याचा यात उल्लेख करून भलतेच वळण दिले जात आहे.
केतकीच्या पोस्टवर कमेंट करणाऱ्यांची संख्या काही तोकडी नाही. सांगू तेव्हढं कमीच अशा प्रतिक्रिया या पोस्टवर दिसून येत आहेत. मात्र यांपैकी काही कमेंट्स अशा आहेत कि, तिच्या आई वडिलांचा आणि अगदी त्यांचा जातींचा जाणीवपूर्वक यात उल्लेख केला गेला आहे. केतकी चितळे मूळ ब्राह्मण असल्यामूळे ती ब्राह्मण आहे म्हणून असं बोलते तिला संस्कार नाहीत असे नेटकरी म्हणताना दिसत आहेत. तर एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले आहे कि, ब्राम्हण समाजात इतकं नीच कोणीच बोलत नाही…. हीचे वडील जरी ब्राम्हण असले, पण आई मागासवर्गीय असल्याने असे संस्कार आहेत… त्यामूळे ब्राम्हण समाजाला टार्गेट करू नये हि विनंती. यानंतर असा काही ब्राम्हण आणि मागास वर्गीयांमध्ये वाद उफ़ाळलाय कि बस्स. या कमेंट नंतर अनेकांनी शिव्या आणि अर्वाच्य भाषेचा वापर करत आपल्या आपल्या जातीबद्दल बोलणाऱ्यांचा कडक विरोध केलाय.
दरम्यान ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई करताना त्यांनी केतकीच्या घरातून तिचा लॅपटॉप आणि ३ मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय तिला हि पोस्ट करण्यासाठी कोणती बळजबरी किंवा कुणाचे समर्थन आहे का यासाठीचीही चौकशी सुरु आहे. मात्र केतकीने मी स्वतःहून पोस्ट शेअर केल्याचे कोर्टात म्हटले आहे. केतकीने सोशल मीडिया फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये शरद पवारांविषयी अतिशय आक्षेपार्ह विधानांचा वापर केला होता. मात्र या पोस्टमध्ये शेवटी ऍडव्होकेट नितीन भावे या नावाचा उल्लेख आहे. तिने यामध्ये लिहिले होते कि,
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
– ऍडव्होकेट नितीन भावे तिच्या या पोस्टवर अजूनही नेटकरी रोष व्यक्त करीत असून हि पोस्ट चांगलीच व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. इतकेच काय तर मनोरंजन क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रात या पोस्टमुळे वातावरण अतिशय नाराजीचे आहे. एकंदरच सांगायचे झाले तर केतकीने स्वतःहून ओढून घेतलेला हा रोष किती काळ राहील सांगता येत नाही. पण तिच्या पोस्टमुळे तिच्या आई वडिलांचा उद्धार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता हे प्रकरण कधी मिटणार..? का आणखी चिघळणार.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Discussion about this post