हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेला कारवाईला सामोरे जावे लागले. न्यायालयाने तिला कोठडी सुनावल्यानंतर तिचा पोलिसांनी ताबा घेतला. अलीकडेच केतकी चितळेची जामीनावर सुटका झाली आहे. पण पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला म्हणत तिने प्रशासनावर विविध गंभीर आरोप केले आहेत. इंडिया टुडेशी बोलताना तिने आपल्या मारहाण केली आणि आपल्यावर विनयभंग झाल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने सांगितले कि, ‘तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला.
पुढे म्हणाली कि, अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराच्या घटना माझ्यासोबत कोठडीत घडल्या आहेत. अशा प्रकारे भारतात बेकायदा पद्धतीनं अत्याचार करण्यात येत आहे असेही तिने सांगितले. शिवाय इतकं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते. पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कारण माझी लढाई अजून संपलेली नाही. अभिनेत्री केतकी चितळे तब्बल २९ दिवस पोलीस कोठडीत होती. तिच्यावर राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २२ एफआयआर होत्या. यांपैकी एका गुन्ह्यातून तिला जामीन मिळाला आहे तर अद्याप इतर २१ गुन्हे कायम आहेत.
Discussion about this post