Take a fresh look at your lifestyle.

‘K.G.F 2’मधील संजय दत्तचा फर्स्ट लूक येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा दाक्षिणात्य चित्रपट अतिशय लोकप्रिय आणि हिट चित्रपट ठरला’  सुपरस्टार यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘केजीएफ चॅप्टर – २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील भूमिका साकारणार आहे. २९ जुलै रोजी संजय दत्तचा चित्रपटातील लूक समोर येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. आता अधीराचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

नुकताच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केजीएफ २ विषयी माहिती दिली आहे. ‘केजीएफ चॅप्टर २मधील अधीराचा फर्स्ट लूक २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ अशी अधिकृत माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Comments are closed.