हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने विश्वातील सर्वाधिक चर्चेत असणारे आणि नवविवाहित ट्रेंडिंग कपल म्हणजे शेरशहा फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची जोडी. खूप दिवस आपल्या नात्याचं गुपित ठेवून अचानक लग्नाची गॉड बातमी देऊन आनंदाचा धमाका करणारी जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. सिद्धार्थ आणि कियारा या नवविवाहित जोडप्याच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यंदाची होळी हि या दोघांसाठी खास आहे. कारण हि होळी त्यांच्या लग्नानंतरची पहिली होळी आहे. त्यांनी एकमेकांच्या आयुष्यात येऊन विविध रंग भरले तशीच हि होळी त्यांच्या आयुष्यात एक गोड रंग घेऊन आली आहे. यानिमित्त कियाराच्या त्यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीच्या सणानिमित्त अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाच्या हळदी समारंभाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. या गोड क्षणी जसा तिच्यावर सिद्धार्थच्या उष्ट्या हळदीचा रंग चढला आणि तिचं आयुष्य रंगीत झालं तशीच आजची होळी सगळ्यांच्या आयुष्यात विविध रंग आणेल यासाठी तिने हे फोटो शेअर केले आहेत. यासोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्याकडून आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा’.
कियाराने हे फोटो सिद्धार्थलादेखील टॅग केले आहेत. या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना अतिशय प्रेमाने न्याहाळत हळद लावताना दिसत आहेत. कियाराच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनीदेखील त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरच्या सूर्यगड किल्ल्यावर अत्यन्त निकटवर्तीयांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली.
शेरशहा या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ- कियारा भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. मात्र लग्नाची बातमी येईपर्यंत त्यांनी आपले नाते सगळ्यांपासून यशस्वीरीत्या लपवले होते. तरीही अनेक ठिकाणी हि जोडी एकत्र स्पॉट झाल्याचे दिसून आली होती. त्यामुळे यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच सुरु असायच्या.
Discussion about this post