हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरण खेर या अनुपम खेर यांच्या पत्नी आणि चंदीगढच्या भाजप पक्षाच्या खासदार आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी चंदीगढ भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी किरण अनुपस्थित होत्या. किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीवर टीका करण्यात आली. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. किरण खेर यांना या आजाराचे निदान गतवर्षी झाले होते. उपचारानंतर किरण खेर यांची तब्येत ठिक असून त्या मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही देखील अरुण सूद यांनी दिली आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये किरण खेर चंदीगढ येथे होत्या. तेव्हाच त्यांना या आजाराबाबत कळलं. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूच ऑफ मेडिकल अॅन्ड एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (PGIMER) मेडिकल टेस्ट केली. या टेस्टनंतर त्यांना मल्टीपल मायलोमा हा आजार असल्याचे समजले. चार महिने उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही पण त्यांना उपचारासाठी नियमितपणे रुग्णालयात जावे लागते, अशी माहिती अरुण सूद यांनी दिली आहे.
किरण खेर यांचे पती ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर विशेष पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी किरण खेर याना झालेल्या आजाराविषयीची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनी व शुभचिंतकांनी पाठविलेल्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत.
Discussion about this post