Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कट्टर शत्रूत्व ते जिगरा यारी!! किरण माने, अपूर्वा नेमळेकर अन अक्षय केळकर दिसले एकत्र; फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 24, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Viral Photo
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर किरण मानेंची नुसती हवा आहे. आधी मालिका विश्व आणि त्यानंतर बिग बॉस मराठी सीजन ४ गाजवून किरण माने यांची महाराष्टाच्या तमाम प्रेक्षक वर्गाच्या मनात जागा मिळवली. सुरुवातील नुसते वाद आणि वाद यामुळे त्यांची चर्चा होत असे. पण आता रांगडं व्यक्तिमत्व म्हणून प्रेक्षक त्यांची प्रशंसा करताना दिसतात. ग्रामीण भागात तर मानेंच भलतंच क्रेझ आहे. बिग बॉसमध्ये असताना किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे टॉप ३ स्पर्धक होते. खेळात या तिघांमध्ये नेहमीच जुंपलेली असायची. हमरी तुमरी, लायकी काढणे आणि, नुसता कलकलाट करून भांडणे हि यांची आयडेंटीटी झाली होती. पण आज किरण मानेंनी स्वतःच अक्षय आणि अपूर्वासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

त्याच काय आहे, अभिनेता किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे ‘रावरंभा’ या चित्रपटात अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुंबईत दणक्यात प्रीमियर शो झाला आणि या निमित्ताने किरण माने, अपूर्वा आणि अक्षय केळकर हे तिघे एकत्र दिसले. बिग बॉसमध्ये कचाकचा भांडलेले अगदी कट्टर वैरी, शत्रुत्व घेतलेले हे तिघे यावेळी एकत्र दिसले. इतकच काय तर एकमेकांना मिठी मारत भेटले. याबाबत किरण माने यांनी एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय कि, ‘टाॅप थ्री! ‘बिग बाॅस’च्या घरात संपूर्ण शंभर दिवस रहाणं हे आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरातल्या सोफ्यावर बसून ‘ग्रॅंड फिनाले’चा नादखुळा माहौल अनुभवणं… युक्ती आणि शक्तीचा मेळ राखून लै लै लै मेहनतीनंतर ‘शेवटचा दिस गोड’ करणं हे सुख फक्त तिघांच्याच वाट्याला येतं… त्यातले आम्ही ‘टाॅप थ्री’ फायनलिस्ट!’

पुढे लिहिलंय की, ‘बिगबाॅसच्या घरात आम्ही जीव खाऊन भांडलो, वाद घातले, एकमेकांविरोधात रणनित्या आखल्या, कुस्त्या खेळल्या, कधी हरलो- कधी जिंकलो. परवा ‘रावरंभा’च्या प्रिमियरला मुंबईत एकत्र भेटलो तेव्हा आणखी एक लक्षात आलं… फिनाले प्रमाणेच हाडवैरी ते दोस्ती हा प्रवास खूप कमी जणांच्या वाट्याला येतो, तो आम्ही तिघांनी केला. आज मनात कुठलंच किल्मिष नाही. असेल तर निखळ मैत्रीच आहे फक्त. भेटलो तेवढ्या कमी वेळात लै धमाल केली आम्ही. खळखळून हसलो, टाळ्या दिल्या… शेवटी फोटोत मध्ये कोण उभे रहाणार यावरून अपूर्वाची जाम खेचली… मज्जा. लब्यू अक्षय आणि अप्पू’. त्यांचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बॉसमधली भांडण खोटी होती कि हि मैत्री खोटी आहे..? असा सवाल केला आहे. इतकेच काय तर नेटकऱ्यांनी अपूर्वाला गर्विष्ठ म्हणत तिची लायकीदेखील काढली आहे. एकंदरच काय तर बिग बॉसच्या खेळातील आक्रमक अपूर्व आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Tags: Akshay KelkarInstagram PostKiran ManeRavrambhaViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group