हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. मालिकांमधून प्रकाशझोतात आलेल्या या अभिनेत्याने बिग बॉस सीजन ४ गाजवला आणि प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं. आज त्यांची फॅन फॉलोईंग तुफान वाढली आहे. पण तितकेच ट्रोलर्स आणि टीकाकारही त्यांना लाभले आहेत. अशाच एका ट्रोलरने बाईच्या नावाचे फेक अकाउंट तयार करून केवळ किरण मानेच नव्हे अन्य बऱ्याच सेलिब्रिटींना अतिशय घाणेरड्या भाषेत ट्रोल केले आहे. या ट्रोलरचे खरे नाव आणि माहिती मिळताच किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला समज दिली आहे. यावेळी त्यांनी या ट्रोलरच्या खऱ्या नावाचा यात आवर्जून उल्लेख केला आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘सागर बर्वे. मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते. गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत’.
‘चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.अजूनही जागा हो माझ्या मित्रा. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकी बाळग. आपण माणसं आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं का काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत. सहज आठवलं म्हणून सांगतो.. ‘बिगबाॅस सिझन चार’ हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. सगळ्या टास्कचा बाप – सी साॅ टास्क! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर – माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं’.
‘तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं ‘सत्व’ हलवू शकत नाही. सोशल मिडीयावर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेंट करणार्या फेक अकाऊंटस्ना घाबरत नाही मी. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला ‘रूतबा’ कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात, कारण आपल्या शब्दांना, विचारांना आणि त्या विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं त्यामुळं असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं…शत्रूवर नजर रोखायची…आणि गालातल्या गालात हसायचं..’पठाण’मधल्या शाहरूखसारखं.क्यों की हमारी ताकत का अंदाजा हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलता है!’ किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून हि पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एव्हाना त्या फेक अकाउंट काढणाऱ्या इसमाने त्याचे मुलं अकाउंट देखील डिलीट केले असेल.
Discussion about this post