Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय भन्नाट कलावंत होते भावांनो…!; अभिनेत्याने जागवल्या निळू फुले, दादा कोंडके आणि पू. ल. देशपांडेंच्या आठवणी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Marathi Legends
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मनोरंजन सृष्टी म्हणजे काय रे भाऊ? फक्त गाणी आणि चित्रपट? मग कल्ला करणाऱ्या हास्यमंचाला काय म्हणायचं? किंवा मग खडबडून जाग आणणाऱ्या भारुडला काय म्हणायचं? असे कितीतरी कलाकार होऊन गेले ज्यांनी या प्रत्येक मनोरंजनाच्या तत्त्वाला जिवंत ठेवलं. काहींनी ही तत्त्व इतकी खोलवर मुरवली की आजही जिवंत आहेत. जसे की, निळू फुले. खलनायक देखील आवडू शकतो हे यांना पाहूनच कळलं. तसेच दादा कोंडके. एखादा मुख्य अभिनेता स्वतःच स्वतःवर हसतो आणि सगळ्यांना हसवतो याच उत्तम उदाहरण आणि पू. ल.देशपांडे. हे तर व्यक्तीचं वल्ली. याच तीन भक्कम व्यक्तींची आठवण करून देणारी पोस्ट अभिनेता किरण माने यांनी लिहिली आहे. चला जाणून घेऊ काय लिहिलंय यात…

 

 

– काय भन्नाट कलावंत होते हे भावांनो…! नादखुळा !! उभ्या-आडव्या-तिडव्या महाराष्ट्राला याड लावलं या तिघांनी… पार धुरळाच उडवून दिला… आजपर्यन्त यांच्या तोडीचा कलावंत झाला नाय…

निळू फुले आनि दादा कोंडके आनि पु.ल. देशपांडे ! तुमी म्हनाल “किरण माने, यात नविन काय सांगताय? आम्हाला माहिती आहे हे.”.. नाय दोस्तांनो, मी ह्यापलीकडचं सांगायला आलोय.. या तिघांमध्ये तीन साम्यं होती.. एक म्हंजी हे अत्युच्च दर्जाचे महान कलावंत होते. दूसरं म्हन्जे हे सर्वसामान्य जनमानसात तुफान लोकप्रिय होते.. आनि तिसरं…?

 

…या तिघांनी सतत राजकीय धोरनांमधल्या विसंगतीवर मार्मिक बोट ठेवलं. समाजाबाबतीत सतत एक भुमिका घेतली. कुनाबी ऐर्‍यागैर्‍याला न घाबरता राजकीय टीकाटिप्पनी केली. वेळ पडली तर सडेतोड सुनावलं. जाब इचारले !

 

…दादा कोंडकें म्हन्लं की ज्यांना फक्त ‘डबल मिनिंग’चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच न्हाईत. त्यांचा कुठलाबी पिच्चर बघा भावांनो. त्यात इंदिरा गांधींच्या धोरनांची मस्त खिल्ली उडवलेली असायची. त्यावेळी काॅंग्रेसचं सरकार असूनबी कुनी त्यांना शिवीगाळ,धमक्या,दबावतंत्र असले प्रकार केले नाहीत. त्यांना संविधानानं दिलेलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित ठेवलं ! शिवसेनेनं मराठी मानसासाठी केलेलं कार्य दादांनी सिनेमातून पुढं नेलं.

 

…हिंदू-मुस्लीम एकतेवरबी दादा पिच्चरमधनं भरभरून बोलले..’राम राम गंगाराम’मधला म्हमद्या खाटीक आनि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती.. त्यात सामाजिक संदेशबी व्हता !! मटनाच्या दुकानात शंकराच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या… ते पाहून ‘भावना दुखावून’ चिडनारा – मटन आनायला आलेला – भटजी… हे समदं लै लै लै खोल व्हतं भावांनो !!! ‘ह्योच नवरा पायजे’ मधला “गाॅड इज वन.. पन नेम्स आर अनेक.” असं म्हनत गळ्यात फादरनं दिलेला क्राॅस आनि दंडात चाॅंदभाईनं दिलेला ताईत बांधनारे दादा ज्याला कळले.. तो दादांना कधीच ‘फक्त’ डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करनार नाय ! त्यातला एक प्रसंग तर लै लै लै खतरनाक हाय.. ‘जाॅन बेकरीत’ गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक शेंडीवाला भटजी अडवतो आणि म्हणतो “कांय रें शिंच्या? हिंदू अंसुन गळ्यांत क्राॅस घांतलांयस? एंकांदंशींच्यां मुंहूंर्तांवर खिंश्चंन झांलांस कीं कांSय?” त्यावर दादा त्याला सुनावतात, “तुम्ही काय केलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे.. हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा ‘जाॅन कॅंबल’ केला..त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय..तुमाला लाज वाटत नाय??? यू बेशरम..तुला जोड्यानंच मारला पायजे,” म्हनत खाडदिशी त्या भटजीच्या थोतरीत देनारे दादा.. आनि घाबरून गळून जानारा भटजी… आनि त्यावर कळस म्हन्जे गळालेल्या भटजीकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना “उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो.” ‘यातलं बिटवीन द लाईन्स’ कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या… दादा ह्यो ‘दादा’ मानूस व्हता !

 

निळूभाऊंबद्दल काय सांगू राजे?? रविंद्रनाथ टागोरांपास्नं राम मनोहर लोहीयांपर्यन्त अनेकांच्या विचारांनी भारलेले निळूभाऊ प्रत्यक्षात जेवढे विनम्र होते तेवढेच सामाजिक विषमता, शोषण,अंधश्रद्धा वगैरेंबाबतीत आक्रमक होते ! समाजवादी चळवळींचं मुखपत्र असलेल्या आणि अनेक दलित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देनार्‍या ‘साधना’ साप्ताहिकाबद्दल “बाकी सगळं मान्य आहे, पण आजपर्यन्त एकाही ब्राह्मणेतराला ‘साधना’चा संपादक का केलं नाही? सगळे ब्राह्मणच कसे?” असा प्रश्न उपस्थित केला होता.. राष्ट्रसेवादलात असताना कुणी आम्हाला फुले-शाहू-आंबेडकरांबद्दल काहीच सांगितलं नाही, असं सांगून त्यांनी समाजवादी चळवळीच्या मर्यादाबी उघड केल्या होत्या. डाॅ. नरेंद्र दाभोलकरांसोबत महाराष्ट्रभर फिरुन त्यांनी आणि डाॅ.लागूंनी अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीला बळ दिलं होतं… नागनाथअण्णा नायकवडी आणि डाॅ. आ.ह. साळूंखे यांच्या मैत्रीत रमनार्‍या निळूभाऊंना बहुजनांमधली पोरं कलाक्षेत्रात यावीत ही आस होती !

 

पु,लंनी ‘महाराष्ट्र भूषण’ घेताना राज्यसरकारलाही झोडलं होतं आणि आणीबाणी काळात तत्कालीन केंद्रसरकारवरही तुफानी तोफ डागली होती ! ...श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, ज्याचं भवतालाचं बारीक वाचन असतं.. समाजव्यवस्थेच भान असतं.. मानवतेची जाण असते.. सच्चा कलावंत जातीधर्मभेदापलीकडे गेलेला असतो.. तळागाळातला सर्वसामान्य मध्यमवर्गीय मानूस तेव्हाच एखाद्या कलाकाराला प्रेम देतो, जेव्हा तो कलाकार मनोरंजन करता-करता त्यांच्या वेदनाही समजून घेतो ! 

 

आजकाल भवताली विषारी सापांच्या पिलावळीचा जो थयथयाट चाललाय, तो पहाताना या तीन कलंदरांची लै लै लै आठवन येती भावांनो… दादा तर भर चौकात येऊन म्हन्ले असते, “तुमच्या मायला मी तुमच्या.. आय डोन्ट वाॅन्ट एनी इंटरनॅशनल फाॅल्लमफोक!”

पन दादा, तुमीच म्हन्लावता ना? “गेली सांगून द्यानेसरी..मानसापरास मेंढरं बरी !” लब्यू लैच.

– किरण माने.

Tags: Dada kondakeFacebook PostKiran Manemarathi actorMarathi IndustryNilu fuleP. L. Deshpande
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group