Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किरण मानेंची ‘संजय राऊत स्पेशल’ खरपूस रेसिपी चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 5, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
10
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. विविध मुद्द्यांवर बेधडक बोलणे आणि थेट वादाला हात घालणे यामध्ये किरण मानेंचा हातखंडा आहे. त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट तुफान गाजतात. अनेक लोक यावर विविध कमेंट्स देत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. बेधडक किरण माने राजकीय मुद्द्यांवर बोलायलाही बिचकत नाहीत. यामुळे सातत्याने समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींबाबत ते आपलं मत बिनधास्त मांडतात. त्यांच्या अनेक पोस्ट चर्चेत राहिल्या आहेत. यानंतर आता त्यांची आणखी एक राजकीय पोस्ट चर्चेत आली आहे. पण हि पोस्ट राजकीय बातम्यांचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी रंजक ठरणार आहे. यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं घेत त्यांनी एक रेसिपी बनवली आहे. त्यामुळे या खुमासदार पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अभिनेता किरण माने यांनी फेसबुक हँडलवर एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. नेहमीप्रमाणे ती चर्चेत आहे. पण हि पोस्ट साधी सुधी समजू नका. हि पोस्ट म्हणजे संजय राऊत स्पेशल डिश आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले आहे कि, साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते…. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात!!

किरण मानेंची हि पोस्ट पाहून सोशल मीडियावरील नेटकऱ्यांमध्ये तर हशा पिकला आहे. त्यामुळे या पोस्टवर चाहत्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, तीन पाकळ्या नेपाळी राणेंना टाकलं नाही म्हणून‌ जाहीर निषेध! तर आणखी एकाने लिहिलंय कि, सर ते लोणचं प्रवीणच राहील त्यांना पन कुठ तरी सामावून घ्याचं ना तोंडी लावाया. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, आता मामी ची रेसिपी पन सांगा सर! याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, हेच्यात ते आसाम चे नवीन जाहिरात वाले राहिले की (पाटील बुवा). आणखी एकाने लिहिलंय कि, Ok मधी आहे सर्व मिश्रण. दादासाहेब.. अशाप्रकारे अनेकांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स करीत पोस्ट नुसती गाजवली आहे.

Tags: Facebook PostKiran ManeSocial Media PostTV Actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group