हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका क्षेत्रातील सतत चर्चेत असलेले अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. छंद म्हणण्यापेक्षा आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे बहुदा त्यांना आवडत असावे. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या विविध विषयांवरील धार्मिक, मार्मिक, जळजळीत, वाचा फोडणाऱ्या आणि विविध पैलू असणाऱ्या पोस्ट चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट चाहत्यांशिवाय अन्य बरेच नेटकरी मिचक्या मारत वाचतात. त्यामुळे मानेंची सोशल मीडियावर किंग साईज व्हॅल्यू निर्माण झाली आहे. सध्या त्यांनी बातमीतून दिशाभूल करणाऱ्या पत्रकारांवर निशाणा साधत एक पोस्ट केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.
अभिनेता किरण माने यांनी हि पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले आहे कि, ‘…पत्रकारितेच्या नांवानं चांगभलं ! मी सतीश तारेच्या नवव्या स्मरणदिनादिवशी केलेल्या पोस्टची बातमी कशी केलीय बघा… असो. आमच्या सुखदु:खावरून केलेल्या दिशाभूलीवर तुमचं पोट चालतंय ना..? मग आनंद आहे. फिकर नाॅट.’ याचा अर्थ असा कि, दिवंगत अभिनेते सतीश तारे यांच्या स्मरणार्थ किरण माने यांनी केलेल्या पोस्टचा मथळा सोयीने बदलून वाचकांसमोर प्रसिद्ध केला गेला आणि याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक, कमेंट आणि अगदी शेअर देखील केले आहेत. यावर एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, भुरटी पत्रकारीता. तर आणखी एकाने लिहिलं कि, चालायचंच पोटाळू आहेत बिचारे. शिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, हे वाचून तर खरच मी शॉक झाले होते. Just च ही पोस्ट वाचली पण आत जाऊन बघतेय तर काय सतीश तारेंची बातमी.
इतकेच नव्हे तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, कोणाबद्दल बोलत आहात अभिनेते पत्रकारिता मीडिया यांच्या बद्दल म्हणे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संपूर्ण विश्वास उडालेला दुफळी माजविणारा जाती धर्मात वादा पेटविणारा सत्य दडवून ठेवणारा लाचारी पत्करणारा समस्या न मांडणारा.. तुमची पोस्ट आम्ही वाचली होती.. मर्म हे आहे तुमच्या पोस्टला लाईक कमेंट जास्त येतात ना मग काय त्याचेही भांडवल होणार! तर अन्य एकाने लिहिलं कि, मी म्हणतो सर तुम्ही हृया पत्रकाराला बोलवुन जाहीर सत्कार केला पाहिजे. याशिवाय, पत्रकारितेला भावपूर्ण श्रद्धांजली.. अशीही कमेंट अनेकांनी केली आहे.
Discussion about this post