हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यामुळे सातत्याने विविध विषयांवर, मुद्द्यांवर राजकीय वा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विषयांवर ते काहीना काही पोस्ट शेअर करताना दिसत असतात. कुणाला काय आवडेल यापेक्षा आपल्या बुद्धीला काय पटेल तसे वागणे आणि निर्भीड बोलणे या अंदाजामुळे माने नेहमीच चर्चेत असतात. बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये सहभागी झाल्यानंतर तर किरण मानेंच्या नावाची भारी हवा झाली. यांची जीवनशैली अजूनही साधी आहे याचं चाहत्यांना अधिक कुतूहल आहे. नुकताच त्यांनी गावातील ज्येष्ठ मंडळींसोबत गप्पा मारण्याचा भारी अनुभव घेत एक पोस्ट शेअर केली आहे .
परिस्थिती कशीही असली तरी माणसाला माणूस गरजेचा असतो. पूर्वी गावखेड्यात माणसं एकमेकांना जोडलेली होती पण आता शहरात याच्या अगदीच सगळं उलट आहे. शिवाय जोडलेली आहेत ती फायद्याशिवाय कुणाकडे पाहतही नाहीत. मोबाइल आणि इंटरनेटच्या जगात आपण माणसांपासून दूर गेलोय असेच म्हणावे लागेल. पण जेव्हा किरण माने माणसांमध्ये मिसळून गप्पा मारत होते तेव्हा त्यांना एक अनुभव आला. त्यांनी या संदर्भात पोस्ट शेअर करताना म्हटले आहे कि, ‘…ह्यो माझा लै आवडता छंद ! गावाकडच्या पारावर बसलेल्या जुन्या खोडास्नी बोलतं करून ऐकत र्हायचं. दुनियेभरचं ग्यान मिळतं. गांवातले सिसिटीव्ही कॅमेरेच. गांवात कायबी घडूदे. कुठल्याबी घटनेटी ग्राऊंड रिॲलिटी हितं पारावर कळते’.
पुढे, ‘नादखुळा भन्नाट गप्पांची जी मैफल इथं जमून येते त्यातली मज्जा ऑनलाईन मिटींग आनि चॅटिंगची सवय लागलेल्या आपल्या पिढीला कळनार नाय. समृद्ध जगण्याला मोबाईलनं न गिळलेली ही शेवटची पिढी ! प्रत्येक गांवात अशी मोजकी जुनी खोडं शिल्लक हायत… जाताना जगण्यातलं लाखमोलाचं असं लै कायतरी सोबत घिवून जानारेत… नंतर आपन खर्या अर्थानं पोरके आनि कंगाल होनार आहोत ! …इस रास्ते में जब कोई साया न पाएगा, ये बुढा सा आख़िरी पेड बहुत याद आएगा !’. या पोस्टमध्ये किरण माने गावात झाडाच्या पारावार गावातील वयस्कर मंडळींसोबत मस्त गप्पा मारत बसल्याचे दिसत आहे’.
Discussion about this post