Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किरण माने म्हणतात, ‘पोलादाहून मजबूत, मेणाहून मऊ.. स्त्रियांशी बरोबरी करू शकत नाही’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
65
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने अभिनेता किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या कर्तुत्वाला कडकडीत सलाम ठोकला आहे. किरण मानेंनी हि पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय कि, ‘.. ती गाढ झोपेत असते. अचानक कानात मोबाईल ‘आरवू’ लागतो. झोपेतच ती वैतागते. डोळे तसेच मिटून, हाताने मोबाईल चाचपून अलार्म ‘ऑफ’ करणार, तेवढ्यात तिचा मेंदू ‘ऑन’ होऊन तिला वाॅर्निंग देतो, “अगं ए..उठ. आज रेवाला सकाळची शाळाय !”… ती ताडकन उठून बसते… दिवसभरातल्या अनेक कामांची लिस्ट तिच्या डोक्यात स्क्रोल होऊ लागते…एका ‘वर्किंग वूमन’चा दिवस भल्या पहाटे सुरू होतो !’

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘किचनमध्ये आल्या- आल्या अनेक प्रश्नांची मालिका मनात सुरू होते. नाष्टा काय करायचा? दुपारच्या जेवणाचं काय? मला १० वाजता कामावर जायचंय त्याआधी संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी करायची??? हे सुरू असतानाच ती किचनमधली रात्रीची भांडी जेवढी गरजेची असतील ती धुवून टाकते.. एकीकडे चहाचे आधण ठेवते… फ्रिजमधून दूध काढून तापायला ठेवते…आज कामवालीही येणार नाही म्हणून झाडू मारायला घेते. “रेवा उठ, सकाळ झाली. स्कूलमध्ये जायचं नाही का?” असं साधारणपणे दहावेळा ओरडल्यावर आणि एकदा तिला गदागदा हलवून उठवल्यावरच ती जागी होते.”

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘…सगळं आवरून रेवाला शाळेत पाठवण्याचं मोठं काम पार पडल्यानंतर दोन घटका शांतपणे ती खुर्चीत बसते. चहाचा पहिला घोट घेतानाच तिच्या मैत्रीणीचे, वैशालीचे शब्द तिला आठवतात, “नेहा, सकाळ सकाळी जिर्‍याचं पाणी पित जा. चमचाभर जिरे आदल्या रात्री भिजत ठेवायचे. तब्येतीसाठी चांगलं असतं.” ती मनातल्या मनात म्हणते, “रात्री विसरलेच. उद्यापासून सुरू करेन.” असं ती रोज ठरवतेय. …पण विशेष म्हणजे आपल्या कुटूंबाची काळजी घेताना, त्यासाठी धडपडताना तिची अजिबात तक्रार नसते बरं का ! मुळात तिला आपण हे वेगळं काहीतरी करतोय असं वाटतच नसतं. पण त्याचवेळी ती थकली असेल, तिला मदत करू असा विचार करणारे तिचे कुटूंबीय खूप कमी असतात हे ही खरं… असो.’

”…तर नवर्‍याच्या ब्रेकफास्टपासुन टिफीनपर्यन्तचे सगळे सोपस्कार पार पाडून ती तिच्या आयुष्यातली तिची दुसरी भुमिका साकारण्यासाठी सज्ज होते… बॅंकेतील क्लार्कची ! बॅंकेत पोहोचल्यावरही ती अनेक जबाबदार्‍या खांद्यावर घेते. बँकेतील व्यवहार हाताळणे, कॅश मोजून माहिती काॅम्प्यूटरमध्ये भरणे, ज्या वयोवृद्ध, अशिक्षित ग्राहकांना फाॅर्म भरण्यात अडचण येते त्यांना मदत करणे, पासबुकांची एंट्री करून देणे, याशिवाय कुणाला कुठल्या स्कीमबद्दल माहीती हवी असल्यास ती देणे…पूर्ण दिवसभर इथेही ती तशीच उत्साहाने सळसळणारी असते !”

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

”अशा अनेक वर्किंग विमेन आज आपल्या आसपास आहेत. एक उदाहरण म्हणून मी बॅंक घेतलं. क्षेत्र कुठलंही असो, दिनचर्या हीच असते…आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची सांगड घालताना वर्किंग वुमनला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे ‘स्वत:साठीचा वेळ’! …काम करणारे पुरूष आरामासाठी शनिवार रविवारची वाट पहातात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात आणि यातूनच बाॅक्सिंग किंवा कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावण्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यन्त मजल मारण्यापर्यन्त काहीही करायला ही स्त्री सक्षम असते.’

View this post on Instagram

A post shared by Be Professional photography (@be_professional_photography)

‘कामातलं समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आम्ही कधीच स्त्रियांशी बरोबरी करू शकत नाही. स्त्रियांकडे संकटाशी लढण्याची आणि राखेतून विश्व उभं करण्याची असामान्य हिंमत आणि ताकद असते. या जगात जर पोलादाहून मजबूत आणि मेणाहून मऊ जर कुणी असेल तर ती ‘स्त्री’ ! महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम ! – किरण माने.’ अशा शब्दात मानेंनी जगभरातील तमाम महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कर्तुत्वाला सलाम केला आहे.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorViral Photowomen's day
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group