हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ नंतर किरण माने प्रचंड चर्चेत राहिले. आधी केवळ वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहणारे किरण माने याना बिग बॉसने एक वेगळी ओळख दिली. त्यामुळे शहरात आणि गावागावांत किरण मानेंची हवा आहे. यानंतर मानेंनी सोशल मीडियावर कमबॅक करत नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. आज पुन्हा एकदा त्यांनी बिग बॉसच्या खेळाची आठवण करून देत एक पोस्ट शेअर केली आहे. हि व्हिडीओ पोस्ट असून यामध्ये त्यांनी बिग बॉस मराठी मधला एक प्रसंग शेयर केला आहे.
हा व्हिडिओ बिग बॉसचे टॉप ५ फायनलिस्ट निवडण्यात आले तेव्हा माने डेंजर झोनमध्ये असतानाचा आहे. या व्हिडिओसोबत किरण माने यांनी लिहिलंय, ‘डेंजर झोनजवळ उभा होतो…आयुष्यातला लै मोठ्ठा डेंजर झोन पार करून या खेळात आलोवतो. जिगरा लावून नव्वद दिवसांच्या वर झुंज दिलीवती. खंबीरपणे पाय रोवून उभा राहीलोवतो. आता या खेळातला हा ‘डेंजर झोन’ पार केला, तर आयुष्याच्या लढाईतला ‘पोएटिक जस्टिस’ मिळणार होता मला !” ”बिगबाॅसमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची एकमेव आणि खात्रीशीर पावती म्हणजे ‘फायनॅलिस्ट’ हे शिखर गाठणं. बाकी सब झूठ. ”
पुढे, ‘.. त्यामुळेच बिगबाॅसच्या दारातनं आत आल्यावर प्रत्येकाचं पहिलं स्वप्न असतं, ‘टाॅप फाईव्ह’मध्ये पोहोचणं! आयुष्यभर काळजात जपून ठेवावा असा ‘फॅमिली विक’चा सोनेरी दिवस नुकताच अनुभवलेला असतो. आता ‘फायनॅलिस्ट’ म्हणून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करून, सन्मानाने दाखवल्या जाणार्या, अद्भूत प्रवासाची भावनिक ‘रोलर कोस्टर’ डोळे भरून पहायची असते… आणि शेवटचा ग्रॅंड फिनालेचा माहौल घरातल्या सोफ्यात सन्मानाने बसून साजरा करण्याची सोनेरी संधी मिळणार असते !! या क्षणानं ते सग्ग्गळं मला दिलं. भरभरून दिलं. मनभरून दिलं. त्यामुळे ही आठवण कधीच विसरणार नाही, लब्यू बिगबाॅस…’.
Discussion about this post