Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘स्वराज्याच्या राजधानीतच ‘भिती’चा कोथळा..’; किरण मानेंनी पोस्टमध्ये केला शिवप्रतापाचा उल्लेख

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 5, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
50
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते विविध विषयावर व्यक्त होत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतीच त्यांनी रावरंभा चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी मानेंनी शिवरायांची शिकवण आणि राजधानी साताऱ्याच्या मातीतील कलाकारांविषयी आवर्जून लिहिले आहे. शिवाय अफजल खानाचा वध या शिवप्रतापाची सणसणीत शब्दांत त्यांनी मांडणी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘छ. शिवराय रावजीला विचारतात, “टकमक टोकाची भिती नाही वाटली?” राव म्हणतो, “भिती?…’भिती’ प्रतापगडाच्या पायथ्याशीच वाघनखात बदलली आन् अफजलखान टर्रर्रर्रकन् फाटला.. गनिमाचं रगात गळालं आन् आई भवानीच्या व्हटातन हसू टपकलं… त्या टपकल्या हसन्यावर ह्यो राव पोसलाय महाराज!” हे ऐकून थिएटरमध्ये प्रत्येकाच्या अंगातलं रक्त दुप्पट वेगानं सळसळतं.. छाती अभिमानानं भरून येती. परवापासून ‘रावरंभा’चे महाराष्ट्रासह सातार्‍यातले सगळे शोज हाऊसफुल्ल चाललेत. शेवटपर्यंत लोक खुर्चीला खिळुन रहातात. स्वराज्याचं वेड प्रत्येक मावळ्याच्या अंगात कसं भिनलं होतं, हे ‘रावरंभा’नं जितक्या प्रभावीपणे दाखवलंय तसं यापूर्वी कधीच दिसलं नव्हतंं. मुळात एका अनोळखी मावळ्यावर सिनेमा काढण्याचं धाडस कुणी केलं नाही’.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘राजधानी सातारच्या मातीतले निर्माते शशिकांत पवार, याच भूमीतले लेखक प्रताप गंगावणे आणि इथलंच पाणी प्यायलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे या त्रिकुटानं हे स्वप्न बघितलं.. धावता घोडा टकमक टोकावर दोन पायांवर उभा करावा, तशी हिम्मत दाखवत ते रूपेरी पडद्यावर साकार केलं! रावरंभाला दुसर्‍या आठवड्यातही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. राजधानी सातार्‍यात तर सगळे रेकाॅर्डस् तुटण्याची चिन्हं आहेत. लै भारी वाटतंय. सिनेमा येण्याआधी आमच्याच क्षेत्रातला एक मोठा दिग्दर्शक मला म्हणाला होता, आजकाल मराठी सिनेमाची एवढी वाईट अवस्था असताना, हा भव्यदिव्य डोलारा उभारण्याची तुमच्या निर्माता दिग्दर्शकाला भिती नाही वाटली??… त्यावेळी त्याला मी तेच उत्तर दिलं होतं, जे रावनं छत्रपतींना दिलंवतं! त्याला हे ही सांगीतलं की स्वराज्याच्या राजधानीतच ‘भिती’चा कोथळा बाहेर निघालाय… निडरपणे झुंजणं हे आमच्या राजानं आमच्या रक्तात भिनवलेलं हाय! जय शिवराय’.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group