Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ठरलं..! ‘मन उडू उडू झालं’ मालिकेला निरोप द्यावाच लागणार; कसा असेल शेवट..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Man Udu Udu Zal
0
SHARES
29
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांची लाडकी मराठी वाहिनी म्हणजेच ‘झी मराठी’. या वाहिनीवरील तशा अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र त्यापैकी काही निवडक मालिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहतील अशा असतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’. ही मालिका जेव्हा पासून सुरू झाली आहे अगदी तेव्हापासूनच तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं असं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील मुख्य पात्र इंद्रा आणि दीपू हे लोकांसाठी त्यांच्या कुटुंबाचा भागच झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यांची जोडी हि लोकप्रिय जोड्यांपैकी एक झाली आहे. सध्या हि मालिका घराघरांत पाहिली जात असून याचा प्रेक्षक वर्ग हा प्रत्येक वयोगटातला आहे. या मालिकेचा टीआरपी सुद्धा बराच चांगला राहिला आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता तुफान आहे. पण आता लवकरच इंद्रा आणि दिपू निरोप घेणार असून हि मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी हे पचवणे कठीण असले तरीही याचा शेवट काय असेल..? याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

गेल्या काही दिवसांपासून ‘मन उडू उडू झालं’ मालिका संपणार.. निरोप घेणार. अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण प्रेक्षकांचा काही विश्वास बसेना. अखेर नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांनाही हादरवून टाकलं. खरंतर प्रेक्षकांना या मालिकेत दिपू आणि इंद्राचा सुखी संसार पहायचा होता. पण झालं उलटंच. संसार राहिला बाजूला मालिकेने टाटा बाय बाय चा सूर लावला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे आता अंतिम टप्प्यात मालिका कशी संपणार..? मालिकेचा शेवट गोड असेल का..? याबाबत चर्चा आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या मालिकेचा शेवटचा भाग हा १३ ऑगस्ट २०२२ रोजी तुम्हाला पाहता येणार आहे आणि आणखी एक भन्नाट बातमी म्हणजे संसार नाही तर नाही.. पण इंद्रा दिपूचा लग्न सोहळा मात्र तुम्हाला पहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/Cf_NaW5L4Ke/?utm_source=ig_web_copy_link

सध्या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट मालिकेचा दर्जा वाढवीत आहेत. इंद्राचं खरं रूप देशपांडे सरांसामोर आल्यानंतर त्यांनी दीपू आणि इंद्राच्या नात्याला नकार दिला. पण मग नंतर इंद्राला सुधरण्याची संधीसुद्धा दिली. यानंतर इंद्रा स्वतःला सिद्ध करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करताना दिसला. यानंतर आता देशपांडे सरांचा विश्वास जिंकण्यात तो यशस्वी झाला असून लवकरच देशपांडे सरांकडे दिपूचा हात मागताना दिसेल. तसा प्रोमोही आता समोर आला आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट हा गोड आहे हे समजतं. शेवटी इंद्रा- दीपूचा विवाह सोहळा रंगेल आणि मग मालिका आपला निरोप घेईल. या मालिकेचा शेवट शुभमंगलने होणार एव्हढं नक्की. पुढे या मालिकेची जागा ‘तू चाल पुढं’ ही मालिका घेइल. येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेत अंकुश चौधरीची बायको दीपा परब पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात एंट्री करत आहेत.

Tags: Ajinkya RautHruta DurguleInstagram PostMan Udu Udu ZalViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group