Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कोरलं नाव मी..’; प्रेम केलं असालं तर ‘i प्रेम u’ चित्रपटातील ‘हे’ गाणं तुमच्या काळजाला भिडणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Koral Naav
0
SHARES
13.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमचं असतं.. पण खरंच गड्या हो सगळे म्हणतात तसं सगळ्यांचं सेम असतं..? आजतागायत लैला- मजनू, हीर- रांझा, सोनी- महिवाल, सलीम- अनारकली आणि रोमिओ- ज्युलिएट सारख्या अनेक प्रेमवीरांच्या नावाचा उल्लेख करत कित्येक लोक प्रेमाच्या आणाभाका घेत आले आहेत. पण सगळ्यांचं प्रेम यशस्वी झालंय का..? आता प्रेम म्हटलं तर येताना अगदी वाऱ्याची झुळूक होऊन, पावसासारखी चिंब भिजवणारी भावना असतं. पण या पावसात विजांचा कडकडाट वाढला.. वादळवारं आलं तर होत्याचं नव्हतं व्हायला काही क्षण पुरेसे असतात. जर प्रेमातली अशी जखम तुमच्याही काळजात झाली असेल तर ‘i प्रेम u’ चित्रपटातील हे नवं गाणं तुम्हाला त्याच प्रेमाची आठवण नक्की करून देईल.

‘साईश्री एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि नितीन गोकुळ कहर दिग्दर्शित ‘i प्रेम u’ हा चित्रपट शुक्रवारी १७ मार्च २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद असलेल्या या चित्रपटातील ‘कोरलं नाव’ हे विरह गीत नुकतेच झी म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘कोरलं नाव’ हे गाणं प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गेले आहे. तर गाण्याचे संगीत हे यशोधन कदम यांनी दिले आहे. तसेच गाण्याचे बोल देखील यशोधन कदम यांनीच रचले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सूत्र मधुकर गुरसाळ आणि नितीन गोकुळ कहर यांनी संभाळली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Abhijit Amkar (@abhijit_amkar)

या चित्रपटात मराठी अभिनेता अभिजीत आमकर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार यांची फ्रेश जोडी आपल्या भेटीस येत आहे. तसेच संजय मोने, प्रतिभा भगत, आनंद सर्जेराव वाघ, हृषीकेश वांबूरकर, समाधान मुर्तडक आणि साईश्री गुरसाळ हे कलाकार देखील अन्य मात्र महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातील प्रेम कहाणी ही फक्त प्रेम कहाणी नसून दोन जीवांच्या प्रेमाची अलगद खुलणारी गोष्ट आहे. मैत्री आणि अलुवार तयार झालेल्या नात्यांची गुंतागुंत वाढली कि सोडवणं जड जातं, अशाच तयार झालेल्या नात्यांची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Tags: Abhijit AmkarKayadu LoharMarathi MovieNew Song ReleaseRushikesh WamburkarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group