Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅलोविनच्या चेंगरा चेंगरीत कोरियन गायकाचा मृत्यू; चाहत्यांना घातपाताची शंका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Lee jihan
0
SHARES
237
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगभरात हॅलोविन फेस्ट साजरा केला जात आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हॅलोविन हा मोठा सण असल्यासारखा साजरा केला जातो. यासाठी ठिकठिकाणी मोठमोठे इव्हेन्ट आयोजित केले जातात. अशाच एका सोहळ्यामुळे अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध कोरियन गायकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता, गायक ली जिहानची याचा हॅलोविन सोहळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Singer Lee Jihan killed in South Korea's deadly Halloween stampede

Read @ANI Story | https://t.co/A34LhjGpPO#SouthKorea #LeeJihan #HalloweenStampede #Seoul #SouthKoreaStampede pic.twitter.com/mhNBqkShrn

— ANI Digital (@ani_digital) November 1, 2022

गेल्या काही दिवसांपासून साऊथ कोरियातील हॅलोविन प्रकरण हे प्रचंड चर्चेत आहे. त्यातच आता प्रसिद्ध साऊथ कोरियन गायक ली जिहानचा अशा पद्धतीने मृत्यु होणे अतिशय संशयास्पद आहे. अनेकांनी हा मृत्यू नसून हि एक हत्या आहे असेही म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी हॅलोविनच्या सोहळ्यात प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती आणि यामध्ये ली जिहानचा गुदमरुन मृत्यु झाला. गायक ली जियान हा फक्त २४ वर्षांचा होता. मात्र त्याची प्रसिद्धी फार होती. संपूर्ण जगभरात त्याचे खूप चाहते आहेत. यामुळे त्याचा मृत्यू हि बाब चाहत्यांसाठी पचविणे सोपे नाही. अनेकांकडून सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची विनंती केली जात आहे.

दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ली जिहानच्या मृत्युची आता कसून चौकशी होणार आहे. जगभरामध्ये विशेष प्रसिद्धी असलेल्या साऊथ कोरियन गायकाच्या मृत्यूमागे कुणाचा हात आहे हे शोधण्यात यंत्रणा सक्रिय झाली आहे. अत्यंत कमी वयातील प्रसिद्धीने त्याचा घात केला असावा असा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. ली जिहानने संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये कॉन्सर्ट केले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने जगभरात अनेक चाहते कमावले आहेत.

Tags: death newsFamous SingerHalloween DayViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group