Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

क्रांती रेडकरचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; ‘रेनबो’च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kranti Redkar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’वर आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित ‘रेनबो’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु झाले आहे. तसेच या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे याचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केले असून लवकरच हा चित्रपट रंगांची मनमुराद उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hridaya (@itshridayaofficial)

या चित्रपटात अभिनेता शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहते. चित्रपटाचे नावच रेम्बो असल्यामुळे चित्रपट काहीसा रंगांची उधळण करणारा आहे. मुळातच ‘रेनबो’ म्हणजे सात विविध रंगांचे प्रतीक. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना विविध रंगात न्हाऊन काढणार हे नक्की. या चित्रपटाचे कथानक आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचे भाष्य करते. मराठी चित्रपटसृष्टीत हा ‘रेनबो’ कलरफुल कथानक घेऊन येतोय.

View this post on Instagram

A post shared by Mangorange productions (@mangorangeproductions)

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते कि, ” ‘रेनबो’ हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. तसेच चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात कि, “क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. ‘रेनबो’ हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

Tags: directionInstagram PostKranti RedkarMarathi upcoming movieRainbow
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group