हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड चित्रपटांवर सलग प्रतिक्रिया देणारा अभिनेता स्वयंघोषित समिक्षक केआरके याला पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई एका वादग्रस्त ट्विटमुळे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कमाल राशिद खान अर्थात केआरकेने २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी २०२२ मध्ये मालाड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आपल्या परखड, खोचक आणि सडेतोड प्रतिक्रियांसाठी केआरके सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र आता याच सवयी त्याला चांगल्याच अडचणीत आणताना दिसत आहेत.
Maharashtra | Kamal Rashid Khan arrested by Malad Police over his controversial tweet in 2020. He was arrested after he landed at Mumbai Airport. He will be presented before Borivali Court today: Mumbai Police
(Pic – Khan's Twitter account) pic.twitter.com/7gjG3sZ43G
— ANI (@ANI) August 30, 2022
काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी केवळ चर्चा होती. मात्र जेव्हा तो मुंबई विमानतळावर आला तेव्हा पोलिसांनी त्याला खरोखरच अटक केली. यांनतर त्याला बोरिवली कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. केआरके विविध वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. याआधी त्याने बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या ‘राधे’ चित्रपटावर केलेला रिव्ह्यु त्याला अडचणीत आणून गेला होता. बदनामी केल्याप्रकरणी सलमानच्या वकिलांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. पण सलमानपुढे कमालने नमतं घेतलं नि प्रकरण संपवलं.
यानंतर आता अलीकडेच रिलीज होऊन फ्लॉप झालेला आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ यावरही केआरकेने अक्कल पाझरवली होती. याचा जो रिव्ह्यु त्याने केला त्याला सोशल मीडियावर मात्र मोठा प्रतिसाद मिळाला. या अशा रिव्ह्यूवरून अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी आतापर्यंत केआरकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पण थांबेल तो केआरके नाहीच. बॉलीवू़मधील नेपोटिझम ते भाईजान, केजो प्रकरण अशा विविध विषयांवर तो नेहमीच बोलताना दिसला आहे. अखेर आता त्याची टिवटिव अटकेपर्यंत त्याला घेऊन गेलीच.
Discussion about this post