हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा ‘किसी का भाई किसी कि जान’ हा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटासाठी आधीच बुकिंग करून थिएटरमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सलमानचे चाहते कौतुक करताना श्वासही घेत नाहीयेत आणि दुसरीकडे अनेक प्रेक्षकांनी इंटरव्हल चांगला नसल्याचे म्हटले आहे. या दरम्यान प्रेक्षक, समीक्षक राहिले बाजूला आणि कमाल आर खान पुन्हा सलमान खानला आडवा गेला आहे.
स्वयंघोषित समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके याने सलमान खानच्या चित्रपटाबाबत एक मोठा दावा केला आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाबद्दल त्याने अनेक ट्विटही केले आहेत. केआरकेने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केलंय कि, ‘KHHKKT चित्रपट पहिल्या दिवशी ७ ते ९ कोटींची साधारण कमाई करू शकेल हे अंतिम आहे. मी सांगितले होते की, मी १० क्रॉस होऊ देणार नाही. सिद्ध केले’.
It’s final that film #KKHKKT will be able to do max Rs.7-9Cr business on Day1. Maine Kaha Tha Ki Inshallah 10 Cross Nahi Karne Doonga. Kar Diya Prove.
— KRK (@kamaalrkhan) April 20, 2023
याआधी केआरकेने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबद्दल ट्विट करत लिहिले होते की, ‘माझ्या सूत्रांनुसार, उद्या ”किसी का भाई किसी की जान”चे निर्माते स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी स्वत:च तिकीट खरेदी करतील. पण सत्य हे आहे की कोसळणाऱ्या ताऱ्यांला कोणीही वाचवू शकत नाही. त्यानंतर आता त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. ज्यात तो सांगतोय की, तो हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलाय आणि त्याने या चित्रपटाचा फर्स्ट हाफ पाहिला जो अत्यंत खराब आहे.
According to my sources, tomorrow, #KKHKKT producer himself will buy Rs.20Cr tickets to save his reputation. But truth is this Ki Doobte Huwe Sitare Ko Koi Nahi Bacha Sakta. Public Sadak Par Laakar Rahegi. Aukaat Dikhakar Rahegi.
— KRK (@kamaalrkhan) April 19, 2023
याआधीही त्याने एक ट्विट शेअर करत लिहिलं होतं की, ‘हा चित्रपट डिझास्टर आहे. सलमान खान ८० वर्षाचा म्हातारा दिसतोय. तर ६० वर्षाचा सलमान त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत रोमांस करत आहे. हो खुप मोठा विनोद आहे’. सध्या सोशल मिडियावर त्याच्या या ट्विटची चर्चा सुरु आहे.
#KisiKaBhaiKisiKiJaanReview#KisiKaBhaiKisiJaan
My Review Of #KKHKKT pic.twitter.com/YRXezyrwhK
— KRK (@SRKLOVER2711) April 21, 2023
याआधी सलमान आणि केआरके मधला वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर केआरके सलमानच्या वाटेला जाणार नाही असे वाटत होते पण आता पुन्हा एकदा त्याने भाईजानसोबत पंगा घेतला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ आज जगभरात ५७०० स्क्रीन्सवर रिलीज झाला असून यातील ४५०० स्क्रीन भारतात तर १२०० परदेशात आहेत.
#KisiKaBhaiKisiKiJaanReview
DISASTERRATING – ⭐#SalmanKhan Is Looking Like 80 yr Old Budhau.
Arey Bhaishab 60 saal ki Umar mei Apni se Aadhi Umar ki ladki se Romance kya Majak karte ho 🤣#ShehnaazGiII was Good Supporting Cast Ne Apna Kam thik Thak Nibahya haiSalman Dadu pic.twitter.com/OgCt9RyMi5
— KRK (@SRKLOVER2711) April 20, 2023
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबत्ती, भूमिका चावला, जगपती बाबू, विजेंदर सिंग, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकार आहेत.
Discussion about this post