Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये क्षिती जोग साकारतेय महत्वपूर्ण भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 26, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Rocky Aur Rani Ki Prem kahani
0
SHARES
90
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अशातच या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये सिनेमाची संपूर्ण कास्ट दिसत आहे. ज्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगचाही समावेश आहे. या चित्रपटात ती अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे आणि याचा तिने आनंद व्यक्त केला आहे. येत्या २८ जुलै २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे पोस्टर पाहून चित्रपट मजेशीर कथानक घेऊन येत आहे हे स्पष्ट आहे. या पोस्टरवर ‘मिट दि रंधवास’ असे लिहिले आहे. या पोस्टरमध्ये रंधवा कुटुंबातील पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड सिनेविश्वातील अभिनेता रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन, रोनित रॉय यांसारखे मोठे चेहरे दिसत आहेत. पण या चेहऱ्यांमध्ये एक मराठी चेहरा दिसतो आहे. हा चेहरा आहे मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती क्षिती जोगचा. या चित्रपटात क्षिती अत्यंत महत्वपूर्ण आणि रंजक भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by kshitee jog | क्षिती जोग (@kshiteejog)

इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती जोग म्हणाली कि, ‘अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती’.

Tags: Aalia BhattBollywood Upcoming MovieKaran joharKshitee Jogranveer singhRocky Aur Rani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group