हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डोंबिवलीचा कुशल बद्रिके आज प्रत्येक घरातला कुशल झाला आहे. चला हवा येऊ द्या मध्ये त्याने उधळले हास्याचे रंग प्रत्येकाच्या गली चढला आहे. कुशल सोशल मीडियावर बराच सक्रिय असल्यामुळे अनेकदा विविध पोस्ट शेअर करतो. यामुळे समजतं कि कुशल जितका उत्तम अभिनेता आहे तितकाच उत्तम लेखकसुद्धा होऊ शकतो. त्याच्या लेखणीला चांगली धार आहे. कुशलने होळी, धुळवडीनिमित्त शेअर केलेली पोस्ट सध्या आयुष्यातील रंगांचं महत्व पटवून देत आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा विविध रंगानी माखलेला आणि मस्त ताशा वाजवतानाचा कमाल फोटो शेअर केला आहे. यासोबत एक भन्नाट कॅप्शन देखील शेअर केलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने कॅप्शन लिहीत म्हटलंय कि, ‘आपल्याला एखाद्या व्यक्ती विषयी नेमकं काय वाटतं, हे सांगताना शब्द कमी पडले की मदतीला “रंग” धावून येतात. म्हणून तर प्रेयसीला आपण “गुलाबी” गुलाब देतो आणि बायकोला “लाल”. रक्ताचं नातं उगाच का म्हणतात तिला!! आता काही माणसं बायकोला गुलाब, देत सुद्धा नाहीत, लग्नानंतर ज्यांच्या आयुष्यातला “रंगच” उडालाय त्यांच्याविषयी आपण काय बोलणार. पण या रंगीबेरंगी दुनियेत “अंतरंग” ओळखणारी माणसं सोबतीला असली ना, की आयुष्य रंगीत होऊन जातं आणि जगण्याचा उत्सव होतो. आपल्या रंगोत्सवाचे रूपांतर जीवनोत्सवात होऊन जाऊ देत . “Happy Holi “ :- सुकून’
अभिनेता कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक नेटकरी तसेच कलाकार मंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुशलची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधी देखील त्याने अशा अनेक अर्थपूर्ण पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्या शिशलं मीडियावर कमालीच्या चर्चेत राहिल्या. कुशलच्या पोस्टवर अनेक नेटकरी त्याच्या लिखाणाचे कौतुक करताना दिसतात. कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, चला हवा येऊ द्या या कॉमिक कार्यक्रमाचा तो अविभाज्य भाग आहे. शिवाय येणाऱ्या वर्षात त्याचे काही सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचा ‘पांडू’ हा चित्रपट आणि ‘स्ट्रगलर साला’ हा वेब शो कमालीचा लोकप्रिय ठरला आहे.
Discussion about this post