Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“विजू माने” उर्फ “विमा”; कुशल बद्रिकेने सांगितली मैत्रीची पॉलिसी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kushal_Viju
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके आपले मनोरंजन करताना दिसत असतो. या कार्यक्रमामुळे तो घराघरात आणि मनामनांत पोहोचल. कुशल बद्रिके म्हणजे प्रतिभावान आणि अस्सल विनोदांचा बादशाह. प्रसंग काहीही असो कुशल त्याच्या उत्तम विनोदी शैलीने तो खास बनवतो. आजच्याही दिवसाला असाच काहीसं खास बनविणारी एक पोस्ट कुशलने शेअर केली आहे. कुशलचा खास दोस्त आणि आघाडीचे दिग्दर्शक विजू माने यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस होता आणि याचेच औचित्य साधून हि पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

अभिनेता कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक विजू माने यांची दोस्ती तर आपल्याला माहीतच आहे. लवकरच या दोन वेड्या मित्रांची ‘स्ट्रगल साला’ ही भन्नाट वेब सीरिज रिलीज होणार आहे. पण आजचा दिवस एकदम खास आहे कारण आज बड्डे आहे भावाचा.. मग लाडक्या मित्राचा वाढदिवस असेल तर सेलिब्रेशन पण जोरदार असणार यात काही वादच नाही. दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त कुशलने हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टागांवर शेअर केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुशलनं अत्यंत हृद्य अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या आयुष्यात विजू माने काय आणि कोणत्या स्थानी आहेत हे त्यानं सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

कुशलने लिहिलंय कि, ‘मी लिहिलेल्या ओळींमध्ये ज्यांना कधीच ‘गाणं’ दिसत नाही, पण त्या ओळींची आज ना उद्या एखादी ‘कविता’ होईल प्रयत्न करत रहा कुश्या! असं कायम प्रोत्साहन देणाऱ्या मित्राचा आज बर्थडे. मी घर घेण्यापासून, ते घरातला बल्ब गेलाय तो बदलून द्या पर्यंत आणि “सिनेमाच्या प्रीमियरला” घालायला कपडे घेऊन द्या, पासून ते कपडे दिलेत! आता मला घेऊन ‘सिनेमा’ करा आणि त्याचा ‘प्रीमियर’ करापर्यंत मी ज्यांच्याकडे काहीही मागू शकतो, अशी एक हक्काची जागा म्हणजे ‘विजू माने’.’

View this post on Instagram

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

पुढे लिहिलं कि, ‘कधी कधी तर मला वाटतं ‘विजू माने’ उर्फ ‘विमा’ देवाने हा माझ्या आयुष्यभराचा ‘विमा’ आधी काढला मग मला जन्माला घातलं. फक्त ‘प्रेमाचं’ प्रिमीयम मात्र कमी पडू द्यायचं नाही. आपल्या मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हीच बाप्पांच्या आणि गुरूजींच्या चरणी प्रार्थना’. दरम्यान असं लिहिल्यानंतर कुशलनं मजेशीर अशी तळटीप लिहिली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, ‘आज तुमच्या वाढदिवसानिमित्त कविता करत नाही हेच बर्थडे गिफ्ट समजा.’

Tags: Birthday Special Postkushal badrikeViju ManeViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group