हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर बॉईज 3 हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. आधीच नवा चित्रपट, नवी कथा आणि नव्या हिरोईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता म्युझिक लॉन्च नंतर चित्रपटातील पहिलेच धमाकेदार गाणे रिलीज झाले आहे. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या येड्या त्रिकुटाचा यात कल्लोळ डान्स पहायला मिळतो आहे. हे गाणं याचे बोल अतिशय भारी आहेत. पण तरीही हे गाणे ट्रोल होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे लग्नाळू 2.0 मध्ये एका वाक्यात दुर्गा देवीचं नाव घेतलं आहे. यामुळे सोशल मीडियावर नेटकरी गाण्यावर टीका करताना दिसत आहेत.
मुख्य म्हणजे सगळे नेटकरी म्हणत आहेत कि, बॉईजमधील लग्नाळू गाण्याची सर या नव्या गाण्याला मुळीच नाही. काही मजा नाही आली.. हिरोईन फेव्हरेट आहे पण डान्स आणि गाणं नाही आवडलं. शिवाय आयटम सॉन्गमध्ये देवीचं नाव कशाला….? नेहमी हिंदू देवांची चेष्टा का करता..? लाज वाटत नाही का..? अशाप्रकारे नेटकऱ्यानी आपला संताप व्यक्त केला आहे. या गाण्यात एका वाक्यामध्ये दुर्गा देवीचे नाव घेतल्यामुळे हि टीकेची झोड उठली आहे. हे एक आयटम सॉंग असल्यामुळे यात देवीचं नाव घेतल्याबद्दल लोकांनी आक्षेप घेतला आहे.
या गाण्यामध्ये अभिनेत्री विदुला चौघुले भन्नाट थिरकताना दिसली आहे. गाण्याची स्टाईल, बोल, म्युझिक, बाज आणि कलाकारांचा अंदाज सगळंच भारी आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा गाण्यांचे रिमेक फसतात. तसाच हा रिमेक फसला आहे असे अनेकांनी म्हटले आहे. याशिवाय काहींनी गाण्याचे भरभरून कौतुकही केले आहे.
अनेकांनी विदुलाच्या यशस्वी प्रयत्नाचं कौतुक केलंय. तसेच आणखी काहींनी म्हटलंय कि, ‘आपल्या मराठी इंडस्ट्रीला पुढे नेलं पाहिजे. गाणं आवडलं नसेल तर त्यावर नेगेटिव्ह बोलणं टाळा.’ पण काही म्हणा सध्या हे गाणं कसं का असेना चर्चेत आहे हे महत्वाचं आहे.
Discussion about this post