Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेमाच्या दर्यात गटांगळ्या खातात प्रेमाळू.. आणि ‘म्हनं लग्नाळू’; 2.0 व्हर्जन रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lagnalu 2.0
0
SHARES
19
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनाचा कहर घेऊन ‘बॉईज ३’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अवधूत गुप्तेचा हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. पण त्याआधी चित्रपटाचं मोशन पोस्टर, टिझर आणि आता हटके गाणं रिलीज झालं आहे. नवा चित्रपट, नवी कथा आणि नवी हिरोईन घेऊन आली आहे प्रेमाच्या दर्यात गटांगळ्या खाणाऱ्या सर्व प्रेमाळूसाठी खास गाणं.. ‘लग्नाळू २.०’ या गाण्याचे बोल बोले तोच एकदम रंपाट आहेत. शिवाय या गाण्यात तुमचे लाडके ढुंग्या, धैर्या आणि कबीर आहेत. नुकतेच हे गाणे रिलीज झाले असून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

‘म्हनं लग्नाळू’ या गाण्यात अभिनेत्री विदुला चौगुले एकदम भारी अंदाजात दिसते आहे. या गाण्यात जोश आहे, जल्लोष आणि फुल्ल मजा आहे. गाण्याचे बोल पण एकदम झकास आहेत. ‘देवाचं घेऊन उगाच नावं, लागलाय मागं केव्हाचा राव’ असे काहीसे याचे बोल आहेत. हे गाणं मराठी गायक अवधूत गुप्ते आणि गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी गायलं आहे.

तर संगीत आणि लेखनही अवधूत गुप्ते यांचेच आहे. तर गाण्याचे नृत्य दिग्दर्शन हे राहुल ठोंबरे आणि संजीव हावलादार यांनी केले आहे. गाणं ऐकायला एकदम सुसाट आणि भन्नाट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व संजय छाब्रिया हे ‘बॉईज ३’चे निर्माते आहेत. सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. या चित्रपटात तेच ३ बॉईज पुन्हा धमाल करताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

म्हणजे अभिनेता पार्थ भालेराव उर्फ ढुंग्या, तर अभिनेता प्रतीक लाड उर्फ धैर्या आणि अभिनेता सुमंत शिंदे उर्फ कबीर. पुन्हा एकदा यांच्या आयुष्यात एक मुलगी आली आहे आणि आता यांचे कसे तीन तेरा वाजतात ते पाहायला चित्रपट पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Tags: Boys 3Everest EntertainmentInstagram PostNew Song ReleaseViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group