हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील हास्यक्वीन वनिता खरात अलीकडेच लग्न बंधनात अडकली. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित सोबत २ फेब्रुवारी रोजी लग्न केले. तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचा साखरपुडा झाला आणि ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळेदेखील लग्न बंधनात अडकला. यांच्या लग्नाची चर्चा संपलीही नाही तोवर मालिका विश्वातील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने लग्न उरकलं आहे.
स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्य’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याने सेजल वर्दे हिच्यासोबत २४ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काहीच फोटो व्हायरल होत आहेत. तर अभिनेत्याने त्याच्या इंस्टावर हळदीचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने सेजल वर्दे हिच्यासोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माहितीनुसार, १ जून २०२२ रोजी अभिजित आणि स्नेहल यांचा साखरपुडा झाला होता. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोदेखील असेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता दोघांनी गुपचूप लग्न उरकलं असून अद्याप आपापल्या सोशल मीडिया हँडलवर फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेले नाहीत.
मात्र व्हायरल फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिजीत आणि स्नेहल याना त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी त्यांचे चाहते आणि कलाकार मंडळी शुभाशीर्वाद देत आहेत.
अभिजित श्वेतचंद्रच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मूळचा अलिबागकर असलेला अभिजित नोकरीत फारसा रस नसल्यानं मनोरजंन क्षेत्राकडे वळला आणि त्याने नाटक, मालिका तसेच काही चित्रपटात अभिनय केला आहे. बाजी, गणपती बाप्पा मोरया, साजणा, बापमाणुस अशा मराठी सिनेमांमध्ये तो दिसला आहे. तर त्याची पत्नी सेजल वर्दे ही अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
Discussion about this post