हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता गेल्या काही काळापासून सिनेमांपेक्षा ओटीटीवरील सिरीज आणि वेब शोमध्ये काम करताना दिसत आहे. गेली २६ वर्ष लारा इंडस्ट्रीती कार्यरत आहे. मोठ्या गॅपनंतर तिने मनोरंजन विश्वात कमबॅक तर केले. पण ओटीटीच्या माध्यमातून. याचे कारण काय..? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. याच उत्तर तिनं एका मुलाखतीत दिले आहे.
अभिनेत्री लारा दत्ताने एका इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने स्वतःच्या वयासोबत ओटीटीविषयी काही महत्वाच्या बाबी समोर ठेवल्या आहेत.
लारा म्हणाली की, ‘आता मी बिझनेस वुमन, आई, बायको आणि एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. आणि या सगळ्या भूमिका साकारताना मला कधी एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागला नाही. ओटीटीनं कलाकारांसाठी खूप संधी उपलब्ध करून दिल्या. मला वाटतं की मी खरं तर आता माझ्या करिअरमध्ये खूप चांगलं काम करत आहे. मी माझ्या प्रोफेशनल जर्नीमधील एक चांगली फेज आता एन्जॉय करतेय. जे सिनेमे आणि शो मी आता करतेय, त्यात मी खूप चॅलेंजिग रोल निवडू शकतेय.’
लाराला ‘करिअरमध्ये वय आडवं येत का..? असे विचारले असता ती म्हणाली, ‘मी माझ्या वाढत्या वयाकडे मला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या रुपात पाहते. मला आता स्वतःला कोणत्या एका कॅटेगरीत फीट करण्याची गरजचं वाटत नाही. सिनेमातील मुख्य अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स म्हणून मला आजही सगळे ग्लॅमरस रुपातच पाहण्याची इच्छा बाळगतात. पण वाढत्या वयामुळे मला भूमिका निवडण्याचं एक विशिष्ट स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य मला कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःसाठी खूप महत्त्वाचं वाटतं.’
Discussion about this post