हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेते इरफान खान हे बॉलिवूड सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते. ते हयात नसले तरीही त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका एव्हरग्रीन ठरल्या आहेत. चाहत्यांच्या मनात आजही इरफान खान यांची जागा जशी होती तशीच आहे. त्यामुळे त्यांचा शेवटचा सिनेमा ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ या चित्रपटाचा हिंदी टिझर रिलीज होताच चाहते भावुक झाले आहेत. ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल याने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डलवर याची माहिती देत सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. सोबत लिहिले, ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ २८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून इरफान खान पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करताना दिसणार आहेत. या ट्रेलरची सुरुवात गोलशिफ्तेह फराहानी म्हणजेच नूरनचे पात्र दाखवून झाली आहे. या चित्रपटात ती वैद्याची भुमिका साकारते आहे. कुणाला विंचू चावल्यानंतर फराहानी उपचार करण्यासाठी खूप दूर जाते. इरफान हे आदमलाची भुमिका साकरताना दिसत आहेत. जो नूरनचा प्रियकर आहे.
या सिनेमात इरफान हे राजस्थानी शैलीतील भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचे कथानक राजस्थानमधील एका गावातील दाखवण्यात आले आहे. प्रत्येक सीनमध्ये दूरवर पसरलेलं वाळवंट दिसत आहे. या चित्रपटाचे संगीत अतिशय दमदार असून ट्रेलर लक्षवेधी ठरतो आहे. यात काही रहस्य दडली आहेत जी सिनेमा पाहताना उलघडत. इरफान यांचा ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ हा सिनेमा सुमारे ६ वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ साली रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा स्विस-फ्रेंच-सिंगापूर भाषेत बनवण्यात आला होता. पण आता हा सिनेमा हिंदीत रिलीज होतोय.
Discussion about this post