हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार अर्थात दिलीप साहब यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी व बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू मात्र एकाकी पडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. दररोजच्या तब्येतीच्या तक्रारी इतक्या वाढल्या कि त्यांना रुग्णालयातही दाखल केले होत. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील पी डी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात सायरा बानू यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयाशी निगडीत समस्या असल्याचे समोर आले. त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल. मात्र, सायरा बानू यांनी एंजिओग्राफी करण्यास थेट नकार दिला आहे.
https://www.instagram.com/p/CTYv-AnKAXa/?utm_source=ig_web_copy_link
अगदी चार दिवसांपूर्वीच सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांच्यावर डॉ. नितीन गोखले उपचार करत आहेत. या दरम्यान “सायरा बानू यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल झालं आहे. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावीच लागेल आणि त्यानंतर त्यांच्यावर पुढील योग्य ते उपचार केले जातील”, असं डॉक्टरांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. मात्र, सायरा बानू यांनी एंजिओग्राफी करण्यास डॉक्टरांना नकार दिला आहे. याशिवाय “सायरा बानू यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. परंतु डिस्चार्जनंतर काही काळाने पुन्हा त्यांना एंजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. परंतु एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांची परवानगी असणं गरजेचं आहे आणि त्यांनी एंजिओग्राफीसाठी अद्याप मान्यता दिलेली नाही. अशीही माहिती डॉक्टरांनीच दिली आहे.
JUST IN: #SairaBanu admitted to Mumbai's Hinduja hospitalhttps://t.co/M7uZkcmYhT
— @zoomtv (@ZoomTV) September 1, 2021
दिवंगत बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर सायरा बानू यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. पतीच्या निधनानंतर सायरा बानू एकाकी पडल्यामुळे त्यामुळे त्या अत्यंत तणावपूर्व मनःस्थितीतून जात आहेत. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत असून उच्च रक्तदाब आणि हाय शुगरचा त्रास एकत्रितपणे जाणवल्यामुळे त्यांना २८ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासामध्ये त्यांना एक्युट कोरोनरी सिंड्रोम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Discussion about this post