हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांचे ९ जून २०२२ रोजी मोठ्या थाटामाटात कल्याणम म्हणजेच लग्न झालं. यानंतर ती आणि तिचा पती लगेच दोघेही कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. दिनांक १० जून २०२२ रोजी नयनतारा आणि विघ्नेश यांना तिरुपती मंदिर समितीकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याच झालं असं कि हे नवविवाहित जोडपं देवदर्शनासाठी १० जून २०२२ रोजी तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. दरम्यान नयनताराकडून काही नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे मंदिर समितीला हे टोकाचे पाऊल उचलणे बंधनकारक झाले.
दिनांक ९ जून रोजी लग्न झाल्यानंतर या नवविवाहित जोडप्याने देवदर्शनाचा घाट घातला. दिनांक १० जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दरम्यान विघ्नेशनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि धोती घातला होता. तर पिवळ्या रंगाच्या साडीत नयनतारा अतिशय सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
https://www.instagram.com/tv/CenpUdXguyJ/?utm_source=ig_web_copy_link
पण या दरम्यान तिरुमला देवस्थानम समितीच्या काही नियमांचं पालन करायला नयनतारा चुकली आणि परिणामी समितीकडून तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मंदिर समितीने केलेल्या आरोपानुसार, नयनताराने मंदिर परिसरात फोटोशूट केले आणि मंदिरात पायातल्या चप्पल न काढताच दाखल झाली. यामुळे तिला हि नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तिरुमला तिरुपति देवस्थानम समितीचे मुख्य सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर यांनी अभिनेत्रीवर आरोप करीत म्हटले आहे कि,” नयनतारा मंदिराच्या परिसरात पायात चप्पल घालून फिरत होती. मंदिरात फोटो काढण्यावर बंदी असताना देखील नयनतारानं फोटोशूट केलं. तिला तात्काळ आमच्या सुरक्षारक्षकांनी थांबवलं. सीसीटी.व्ही फूटेजमध्ये देखील नियम धाब्यावर बसवत पायात चप्पल घालून ती फोटो काढताना दिसली आहे. मंदिर समितीने या संदर्भात अभिनेत्रीसोबत बातचीत केली आहे आणि व्हिडीओ मेसेज करुन त्या माध्यमातून माफीनामा देखील जारी करायला सांगितला आहे. या व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून नयनताराने भगवान बालाजी, मंदिर व्यवस्थापन समिती आणि भक्तांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे”. नयनतारानेदेखील माफी मागण्यास तयारी दर्शवली आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post