हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच बॉलीवूडमधून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी आणि अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन झाले आहे. भारती यांचे २० सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. हि माहिती अभिनेत्री आणि फिल्मेकर नंदिता दास यांनी दिली आहे. तर भारती जाफरी यांच्या जावयाने याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. भारती जाफरी यांना अनेक कलाकारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
अभिनेत्री भारती जाफरी यांच्या निधनानंतर बॉलीवूड अभिनेता आणि भारती यांचा जावई अभिनेता कंवलजीत सिंह यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अशोक कुमार यांच्यासमवेत असलेला भारती जाफरी यांचा एक आठवणीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्यांनी अत्यंत भावुक असे कॅप्शन लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे कि, ‘आमच्या आमचे प्रिय भारती जाफरी, मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी, काकू, शेजारी, मित्र आणि प्रेरणा… आज २० सप्टेंबर रोजी आम्हाला सोडून गेल्या. आम्ही त्यांना पहाटे १.३० वाजता घरी घेऊन आलो. आज संध्याकाळी 403 अशोक कुमार टॉवर्स, 47 युनियन पार्क, चेंबूर 71 येथे अखेरचा निरोप घेतला. त्यानंतर चेरई स्मशानभूमी, चेंबूर कॅम्प येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. ..ओम शांती…’
चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांनीदेखील भारती याना श्रद्धांजली वाहिली आहे. इ टाइम्ससोबत बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘भारती जाफरी ही एक संपूर्ण जीवनातील एक विशिष्ट व्यक्ती होती आणि प्रत्येकजण तिला लक्षात ठेवेल. अनुराधा (पटेल) आणि कंवलजीत (सिंग) हे घरातील मित्र असले तरी, भारती दी तिच्या विचारशील भावनांनी आम्हाला एकत्र आणत असे. माझा प्रत्येक वाढदिवस ती कधीच विसरत नव्हती.. मला तिची खूप आठवण येईल. आणि ती एक विशेष हुशार अभिनेत्री होती याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे. RIP दी.. ओम शांती’. भारती जाफरी यांनी हजार चौरासी की माँ, सांस आणि दमन या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Discussion about this post