हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता वर्ष सरलं आणि पुन्हा एकदा बिग बॉस मराठी त्याच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचा लाडका आणि आवडता रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या शोचे भन्नाट आणि उत्सुकता वाढवणारे प्रोमोदेखील रिलीज झाले आहेत. हे प्रोमो पाहून बिग बॉस मराठीच्या या तिसऱ्या सिजनमध्ये कोणते स्पर्धक पहायला मिळणार? आणि हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात आल्यावर राडा होणार, लफडी होणार, दंगा होणार कि पसरणार शांतता? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीजन येत्या १९ सप्टेंबर २०२१पासून रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
https://www.instagram.com/p/CTG0JBnKXRq/?utm_source=ig_web_copy_link
पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्वभावाची, ढंगाची लोक ९० दिवसांसाठी एकत्र येणार आहेत. एकाच घरात एकमेकांसोबत कधी कट्टी तर कधी बट्टी करताना दिसणार आहेत. या ९० दिवसात बरंच काही बदलतं. त्यामुळे घरात टिकून राहण्याचं आव्हान घेऊन हे स्पर्धक एकमेकांसह चुरशीची लढत करतात. या स्पर्धेत एकमेकांना साथ देत टिकून राहायचं की स्वतःचा मार्ग निवडत एकट्याने खिंड लढवायची हे ज्याचं त्याचं सूत्र आहे. कारण संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कलाकारांचे स्वभाव प्रेक्षकांसमोर येतात. दरम्यान कलाकार इतरांना देत असलेल्या वागणुकीवरही प्रेक्षक त्यांना मतं देतात. काही प्रेक्षकांचे लाडके तर काही नावडते होतात. मागील दोन सिजनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकून घेत स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान कायम केले आहे.
https://www.instagram.com/p/CTCy5BoK9hf/?utm_source=ig_web_copy_link
यानंतर आता बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आणि हे स्पर्धक कसा खेळ खेळणार हे लवकरच कळेल. दरम्यान ‘बिग बॉस मराठीच्या’ येत्या तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित हेच कलाकार बिग बॉस हाऊसचे गेस्ट असू शकतात. चला तर जाणून घेऊयात या शोमध्ये सहभागी होणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे:-
https://www.instagram.com/p/CTFHD0bK5Vi/?utm_source=ig_web_copy_link
१. आनंद इंगळे
२. कमलाकर सातपुते
३. अंशुमन विचारे
४. प्रणित हाटे
५. पल्लवी पाटील
६. नेहा जोशी
७. पल्लवी सुभाष
८. भाग्यश्री लिमये
९. नक्षत्रा मेढेकर
१०. खुशबू तावडे
११. अक्षया देवधर
१२. रुपल नंद
१३. संग्राम समेळ
१४. सुयश टिळक
१५. चिन्मय उदगीरकर
आता उत्सुकता एकच कि हे सर्व खरोखरच एकत्र एका घरात ९० दिवसांसाठी जमले तर काय होणार?
Discussion about this post