हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टोरीटेल’वर गुरूवारी २३ सप्टेंबर २०२१ रोजी ‘सायको किलर’ या क्राईम सिरीजचं उत्कंठावर्धक कथानक रिलीज झालं आहे. निरंजन मेढेकर लिखित व अभिनेता नचिकेत देवस्थळीच्या दमदार आवाजात ‘सायको किलर’ला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शहरात एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्याकांडांभोवती व प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलिसांना मदत करणाऱ्या तरुण बातमीदाराभोवती हि कथा फिरतेय.
दोस्तहो… तो येतोय… होय.. तो येतोय.. त्यामुळे संध्याकाळी दारावर अचानक अनोळखी थाप पडली तर लगेच जाऊन दार उघडू नका! कारण ९०च्या दशकातील शांत पुण्यात खुनांचं गूढ सत्र सुरू आहे. पोलिसांनासुद्धा या गुन्ह्यांचा तपास लागत नाहीये. तर बातमीसाठी धडपडणारा क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे या सगळ्यात गुंतत चाललाय. यात एकदा फसलं की जिवंत बाहेर पडणं अशक्य आहे हे त्याला ठाऊक नाही. एका बातमीवरून सुरू झालेला हा प्रवास निलेशला कायमचा संपवणार का आणखी काही वेगळं घडणार?
‘सायको किलर’च्या मानसिकतेचा अभ्यास करत पोलिस त्याच्यापर्यंत पोचतात का? शहरात सुरू असलेली हत्याकांड थांबतात का? क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे यातून कसा सुटणार? अश्या अनेक प्रश्नांची उत्तंर मिळवण्यासाठी सायको किलर ऐका. या सीरीजचं कथानक पुण्यात घडलेल्या सगळ्यात मोठ्या हत्याकांडावर प्रेरित आहे. निरंजन मेढेकर मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये बातमीदारी केलेली असल्यामूळे पत्रकारांचा संघर्ष त्यांना ओळखीचा आहे. म्हणूनच कदाचित यात मराठी पत्रकारितेचं आणि बातमीदारांच्या भावविश्वाचं वास्तवदर्शी चित्रण सखोल केलं आहे.
सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘ती परत आलीये’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला लाभलाय. या सीरीजमध्ये पत्रकार, पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हेगार, मनोविकारतज्ज्ञ अशी वेगवेगळी पात्रं असली तरी नचिकेतने आपल्या दमदार आवाजाने आणि उत्तम व्हॉईस मॉड्युलेशनने सरब पात्र जिवंत केली आहेत. त्यामुळं नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला शोभतोय पण आणि गाजतोय पण. हा थरार अनुभवण्यासाठी एकदा श्रोत्यांनि जरूर हि ऑडिओ बुक ऐकावी.
Discussion about this post