हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या मालिकेमध्ये तिने साकारलेली गृहिणी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहणारी स्त्री प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. त्यामुळे आजतागायत हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये कधीच पिछाडली नाही. प्रेक्षकांनी नेहमीच या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ दिमाखात पार पडला आणि यामध्ये कलाकारांच्या कामाचे कौतुक करत त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी मधुराणीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मधुराणीला तिने साकारलेल्या अरुंधतीमुळे सलग तीन वर्ष पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. यासाठी तिचे चाहते आणि प्रेक्षक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने यंदा ‘महाराष्ट्राची लाडकी व्यक्तीरेखा’ म्हणून पुरस्कार पटकावला आहे. याबाबत मधुराणीने एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे कि, ‘स्टार प्रवाह पुरस्कार… सलग तीन वर्ष… पहिलं वर्ष : सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, दुसरं वर्ष : सर्वोत्कृष्ट आई, तिसरं वर्ष : महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा. स्टार प्रवाहचे मनापासून आभार. इतकी सुंदर भूमिका मला देऊ केली. त्यामुळे मी घराघरात पोहचले. अगणित रसिकांचं प्रेम संपादन करू शकले’.
पुढे लिहिलं आहे कि, ‘निर्माते राजन शाही सर यांचेही शतशः आभार. तसंच आमची प्रोजेक्ट हेड आणि कथा पटकथा लेखिका नमिता वर्तक आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर, संवाद लेखिका मुग्धा गोडबोले या तिघांनी ही भूमिका घडवली आहे त्यांचेही आभार. संपूर्ण टीमचे आभार. मालिकेमधील सगळ्या उत्कृष्ट कलाकारांचे आभार. या मालिकेमधील प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करतो. म्हणून ही मालिका इतकी लोकप्रिय आहे. या शंका नाही’. या पोस्टवर मधुराणीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा अगदी पाऊस पाडला आहे.
Discussion about this post