हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर घराघरात पोहोचली. यामुळे मधुराणीचं फॅनफॉलोइंग एकदम जबरदस्त आहे. मधुराणीच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ती अशी कि, मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची ऑनलाईन पद्धतीने चक्क फसवणूक करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आखलेलं व्हॅकेशन प्लॅन त्यांच्या चांगलाच अंगाखांद्याशी आलं आहे.
अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांना ऑनलाईन पद्धतीने तब्बल १७ हजाराचा गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी गणपतीपुळे येथे ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलमध्ये त्यांनी दोन दिवसांसाठी १७ हजार रुपये देऊन बुकिंग केले होते. मात्र हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या नावाने कोणतीच बूकिंग झाली नसल्याचे त्यांना समजले. दरम्यान प्रमोद प्रभुलकर यांनी मॅनेजमेंटसोबत बातचीत केली असता मॅनेजमेंटने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप प्रमोद यांनी केला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे रिसॉर्ट शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे आहे. अशी माहिती मॅनेजमेंटने दिली आहे. हे हॉटेल ४ स्टार दर्जाचे आहे. मात्र असे असूनही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अशी फसवणूक झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. परंतु ही फसवणूक हॉटेलकडून झालेली नाही, हेदेखील वेळीच उघड झाले आहे. रिपोर्टनुसार, काही उत्तर भारतीय व्यक्तींनी या हॉटेलची साईट हॅक करून अशी फसवणूक केली आहे. मुख्य म्हणजे प्रभूलकर यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीची तब्बल १ लाख ६० हजारांची फसवणूक झाल्याचा व्हिडओदेखील माध्यमात व्हायरल होतो आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार एकंदरच धक्कादायक आहे.
Discussion about this post