हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत कित्येक नवनवीन अभिनेत्री आल्या आणि त्यांनी आपल्या सौंदर्याची कमाल दाखवली. पण तरीही नव्वदीचा काळ गाजवलेल्या काही अभिनेत्री आजही स्टेजवर उभ्या राहिल्या तर आत्ताच्या अभिनेत्रींना कॉम्प्लेक्स येतो. यामध्ये रेखा, काजोल, सुश्मिता सेन, रविना टंडन आणि धकधक गर्ल माधुरीच्या नावाचा सर्रास उल्लेख होतो. यांपैकी माधुरी तर सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि तिचा काळ संपूच नये असे प्रत्येकाला वाटते.
काय ते सौंदर्य, काय ते हास्य आणि काय ती अदा… त्यात तीच साडीवरील प्रेम काही औरच..! कोणत्याही सोहळ्यात मोठ्या कार्यक्रमात ती हमखास साडी परिधान करते. आताही सोशल मीडियावर तिचे काही साडीतील फोटो कमालीचे व्हायरल होताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती अनेकदा आपल्या नवनवीन लुक्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अलीकडच्या काही दिवसांमध्ये तिने काही साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे पाहून एक एक नेटकरी घायाळ होतो आहे. यातील हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर फारच चर्चेत आहेत. आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते असे अनेकांचे म्हणणे आहे.
याशिवाय माधुरीचा रेट्रो लुकदेखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला आहे. याशिवाय तिचे विविध लॉन्ग गाऊन आणि ड्रेसमधील फोटोदेखील सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात.
माधुरीच्या या व्हायरल फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘मॅम तुम्ही इतक्या सुंदर का दिसता.. मी मरेन कधीतरी’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘अगं सुंदरी आमच्याशी असं करू नकोस.. तू आमच्या हृदयाचा ठोका चुकवते आहेस’.
अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती झलक दिखला जा या हिंदी डान्सिंग रिऍलिटी शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. तसेच येत्या ६ ऑक्टोबर २०२२ रोजी तिचा ‘मजा मा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ‘रंगीला मारा डान्स’ हे गाणे अलीकडेच रिलीज झाले आहे. यामध्ये माधुरीचा कमाल अंदाज पहायला मिळाला आहे.
Discussion about this post