Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गुड फ्रायडे’च्या शुभेच्छा देऊन माधुरीच्या नवऱ्याने केली चूक; नेटकऱ्यांनी काढली अक्कल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Hot News, Trending, बातम्या, सेलेब्रिटी
Dr. Shriram Nene
0
SHARES
152
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. आजही तिच्या सौंदर्यावर तरुण आपलं हृदय हरताना दिसतात. मात्र माधुरी हृदय हरली ती मिस्टर नेनेंकडे. असे असले तरीही माधुरीच्या चाहत्यांची संख्या आजही मोठी आहे. सोशल मीडियावर आपल्या सौंदर्यामुळे वारंवार चर्चेत असणारी माधुरी आज तिच्या नवऱ्यामुळे चर्चेत आली आहे. त्याच झालं असं कि, माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी ‘गुड फ्रायडे’च्या शुभेच्छा दिल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

Happy and Good Friday to all who celebrate!

— Dr. Shriram Nene (@DoctorNene) April 7, 2023

 

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती भारतीय- अमेरिकन कार्डियोवस्कुलर सर्जन पती डॉ. श्रीराम नेने यांनी ‘गुड फ्रायडे’निमित्त एक ट्विट शेअर केले. यामध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘हॅपी अँड गुड फ्रायडे… ज्यांनी तो साजरा केला त्यांच्यासाठी.’ हे पाहून नेटकरी संतापले आणि मग काय श्रीराम नेनेंची शाळा सुरु झाली. त्याच काय आहे, ‘गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मामधील लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ईस्टरच्या आधी येत असलेल्या शुक्रवारी हा दिवस पाळण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्व शासकीय अणि खाजगी कार्यालयांना सुट्टी असते म्हणजे हा दिवस ख्रिश्चन धर्मीयांसाठी आनंदाचा असेल असे अनेकांना वाटते. मात्र हा दिवस त्यांच्यासाठी कोणताही सण नसून हा एक दुखाचा दिवस आहे. कारण या दिवशी येशु ख्रिस्त यांना क्राॅसवर चढवण्यात आले होते आणि त्यामुळे या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक शोक व्यक्त करतात’.

Who celebrates good Friday sir?? It's the day of prayers and mourning. Not celebration. Some brush up on General Awareness might be of a help before you tweet something like this!

— Nikhil Agwan😎 (@nikhilagwan) April 7, 2023

पण ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी श्रीराम नेने यांनी नेटकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या चुकीमुळे ते ट्रोल्सच्या निशाण्यावर आले. श्रीराम नेने यांच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, ‘सर गुड फ्रायडे कोण साजरा करतात? हा आशीर्वाद मागण्याचा दिवस आहे. उत्सव साजरा करण्याचा नाही’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘ट्विट शेअर करण्यापूर्वी तुम्ही सामान्य ज्ञान मिळवण्याची गरज आहे’.

How illogical of you…. The day someone sacrificed his/her life for the well being of others can have a sense of gratitude and prayer. Not celebration. A birth can be celebrated, victory of truth over evil can be celebrated but not sacrifices. They are to be thanked for.

— Nikhil Agwan😎 (@nikhilagwan) April 8, 2023

तर आणखी एकाने म्हटले कि, ‘तुमची अक्कल किती आहे ते कळतंय.. ज्या दिवशी एखाद्याने इतरांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या दिवशी कृतज्ञता आणि प्रार्थनेची भावना असू शकते. उत्सवाची नाही. जन्म साजरा केला जाऊ शकतो. वाईटावर सत्याचा विजय साजरा केला जाऊ शकतो. मात्र त्याग साजरा केला जात नाही. त्यांचे आभार मानले जातात’.

Tags: madhuri dixitShreeram neneSocial Media Trollingviral postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group